कुडणे येथे कार्यक्रमात "आम आदमी पार्टी" मध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना   पत्रकार मनोजकुमार घाडी, सोबत आपचे गोवा प्रभारी दुर्गेश पाठक, निरिक्षक अंकुश नारंग, प्रवक्ता वाल्मिकी नाईक, उपेंद्र गावकर, गितांजली जल्मी, गुरुदास जल्मी व इतर
कुडणे येथे कार्यक्रमात "आम आदमी पार्टी" मध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना पत्रकार मनोजकुमार घाडी, सोबत आपचे गोवा प्रभारी दुर्गेश पाठक, निरिक्षक अंकुश नारंग, प्रवक्ता वाल्मिकी नाईक, उपेंद्र गावकर, गितांजली जल्मी, गुरुदास जल्मी व इतर चंद्रशेखर देसाई
गोवा

Goa Politics: साखळी मतदार संघातून "आम आदमी पार्टी" चे मुख्यमंत्र्यांना आव्हान!

दैनिक गोमन्तक

साखळी: साखळी मतदार संघातून "आम आदमी पार्टी" (Aam Aadmi Party) निवडणूक लढविणार आहे. आमोणा येथील राहिवाशी, पत्रकार, मनोजकुमार युथ असोशिएशनचे अध्यक्ष, समाजकार्यकर्ते मनोजकुमार घाडी यांनी आपल्या समर्थकांसह आज "आम आदमी पार्टी" मध्ये प्रवेश करुन साखळी मतदार संघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात हजारो कार्यकर्ते "आम आदमी पार्टी" मध्ये साखळी येथील भव्य कार्यक्रमात प्रवेश करतील असा दावा ही केला.

कुडणे येथे गुरुदास जल्मी यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे गोवा प्रभारी दुर्गेश पाठक, निरिक्षक अंकुश नारंग, गोवा प्रवक्ता वाल्मिकी नायक, आम आदमी पार्टी मध्ये नुकतेच प्रवेश केलेले उपेंद्र गावकर, कुडणेच्या माजी उपसरपंच गितांजली गुरुदास जल्मी, गुरुदास जल्मी, आम आदी पार्टीचे नेते प्रदीप घाडी आमोणकर आदींची उपस्थिती होती. मनोजकुमार घाडी यांच्या बरोबर कुडणेतील माजी उपसरपंच गितांजली जल्मी, गुरुदास जल्मी यांनीही आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला

आम आदमी पार्टीचे गोवा प्रवक्ता यावेळी बोलताना म्हणाले आम आदमी पार्टीने दिल्ली मध्ये लोकाभिमुख सरकार देऊन सरकार कसे असावे हे दाखवून दिले आहे. आज या सरकारचे कौतुक देशातच नव्हे तर संपुर्ण जगात होत आहे. सर्वसामान्य लोकांच्या मुलभूत गरजा सोडविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल काम करतात. जनतेला विज, पाणी, शिक्षण, आरोग्य या सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत हे केजरीवाल यांचे उद्दिष्ट आहे. महिलांना सरकारी बसमधून प्रवास फुकट आहे. दिल्ली सारखे जनकल्याणाचे सरकार गोव्यामध्ये आणण्यासाठी आप ला समर्थन द्या. सध्या गोव्यात भाजप व कॉग्रेसचे भेसळ झालेले भ्रष्ट सरकार कार्यरत आहे. दोघांनीही गोव्याला लुटण्याचाच धंदा सुरु केला आहे. जनतेच्या कररुपी आलेल्या पैशांवर सरकार ताव मारत आहे. या सरकारला अद्दल घडवा व आप ला सत्तेवर आणा असे आवाहन केले.

भाजप सोडून नुकतेच आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केलेले उपेंद्र गावकर यावेळी बोलताना म्हणाले. भाजप सरकारच्या नोकऱ्या, विविध योजना या केवळ भूलथापा आहेत. पेट्रोल, गँस लिडिंडर वाढवून भाजपने महागाईद्वारे जनतेचे कंबरडेच मोडले आहे. "आप" ने मोफत विज म्हटले तर "भाजप" ने लगेच पाणी मोफत म्हटले.आप च्या कार्यामुळे भाजपची झोप उडाली आहे.आप चीच सत्ता गोव्यात येणार.

पंधरा दिवसात हजारो कार्यकर्ते आपमध्ये

आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार मनोजकुमार घाडी यांनी पक्ष नेतृवाला पक्ष प्रवेश दिल्याबद्दल धन्यवाद दिले. गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्रासाठी पत्रकार व सध्या "मेडन मिडिया" न्युज चँनलचा संचालक म्हण्न कार्यरत आहे. तसेच मनोजकुमार युथ असोसिएशन या सामाजिक संघटनेतर्फे समाजासाठी गेली अनेक वर्षे आपण कार्यरत असून आपला जनसंपर्क मोठा आहे. येत्या पंधरा दिवसात साखळी मतदार संघातील हजारो कार्यकर्ते आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करतील व हा कार्यक्रम साखळी शहरात घडवून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पत्रकार मनोजकुमार घाडी, गितांजली जल्मी, गुरुदास जल्मी यांचे पुष्पहार घालून आम आदमी पार्टीमध्ये स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगम भोसले यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT