Manohar Parrikar | Dainik Gomantak
गोवा

Goa News : पर्रीकरांच्या भावचित्राचे मुख्यमंत्री सावंतांच्या हस्ते होणार अनावरण

मंगळूर येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भावचित्राचे अनावरण होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Manohar Parrikar: शक्तिनगर-मंगळूर येथील विश्व कोकणी केंद्राच्या संकुलात बुधवार, 8 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते केंद्राचे संस्थापक कोकणी सरदार बस्ती वामन शणै यांच्या पितळी पुतळ्याचे, तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या भावचित्राचे अनावरण होणार आहे.

त्याचबरोबर श्रीमती इंदिरा व गडाय लक्ष्मण पै श्रेष्ठता केंद्र व श्रीमती सीता व दर्बे रमानाथ नायक मैरा प्रदर्शनी सभांगणाचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष नंदनगोपाळ शणै यांनी दिली.

देशातील कोकणी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी विश्वकेंद्र कार्यरत असून गोवा हे कोकणीचे मूळ पीठ असल्याने गोव्याकडील संबंध अधिक वृद्धिंगत करण्याचा मनोदय शणै यांनी व्यक्त केला.

कोकणी भाषा आणि संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. दयानंद पै यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल. गुरुवार, 9 रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्यात विश्व कोकणी पुरस्कारांचे वितरण होईल.

विविध सत्रांत परिसंवाद

  • उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. किरण बुडकुले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘कोकणी नाटक : परंपरा प्रयोग व नवपरिवर्तन’ या परिसंवादात ईशा नाडकर्णी, ग्लेनिस मेंडोन्सा डिसोझा, दत्तगुरू जोशी, स्वेतलना फर्नांडिस व सुभाष कमलकर सहभागी होतील.

  • मेलविन रॉड्रिग्स यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘कोकणी साहित्य : दशकाची प्राप्ती व भविष्यकाळ’ या विषयावरील परिसंवादात एच.एम. परनेल, अन्वेषा सिंगबाळ, डॉ. हनुमंत चोपडेकर व टिटस नोरोन्हा भाग घेतील.

  • ‘आंतरजाळ कोकणी : नव्या संकल्पना’ याविषयावर वंदना कामत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात संध्या शणै, बस्ती शोभा शणै, सचित्र शणै, डॉ. विजयालक्ष्मी नायक, गीता नायक व मेधा नायक सहभागी होतील.

  • ‘भाषा तंत्रज्ञान आणि कोकणी’ याविषयावर चेतन आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात रॉयल सिक्वेरा, डॉ. ज्योती पवार व कॅरोन माडथा भाग घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT