mla carlos almeida

 

Dainik Gomantak 

गोवा

'गोव्यातील भाजप स्व: मनोहर पर्रीकरांचा पक्ष राहिला नाही'

गोव्यातील (Goa) भाजप स्व: मनोहर पर्रीकरांचा (manohar parrikar) पक्ष राहिलेला नाही. यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: गोव्यातील (Goa) भाजप स्व: मनोहर पर्रीकरांचा (manohar parrikar) पक्ष राहिलेला नाही. यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. मला वास्कोतुन भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याची माहीती काही महिन्यापूर्वी वास्को भाजप गट अध्यक्ष दीपक नाईक यांनी संघटन मंत्री सतीश धोंड त्यांच्यासमोर सांगितली होती. याचा साक्षीदार येथील हॉटेल व्यवसायिक संजय शेट्ये असल्याची माहिती वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा (mla carlos almeida) यांनी दिली.

माझ्या उमेदवारीच्या कारकिर्दीत वास्कोतील मुरगाव पालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागात बऱ्यापैकी विकास साधलेला आहे. उगाच माझ्यावर विकास केला नसल्याचे आरोप करणे चुकीचे आहे. राज्य सरकारने मुद्दामहून वास्कोतील मोठे प्रकल्पाचे काम केले नसल्याने माझ्यावर आरोप होत आहे. दाजी साळकर यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतः किती प्रामाणिक आहे ते सिद्ध करावे.

वास्को खारी वाडा येथील करोडो रुपयांची जमीन बेकायदेशीर परस्पर विकून साळकर यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा पुरावा माझ्याजवळ असल्याचा दावा माजी आमदार आल्मेदा यांनी केला आहे. तसेच दाजी साळकर यांनी वास्कोचे ग्रामदेव दामोदर यांच्या सप्ताहात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आल्मेदा यांनी केला.

राज्यातील भाजप (BJP) आता स्वः पर्रीकरांचा पक्ष राहिलेला नाही. यामुळे भाजप पक्ष येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागणार असल्याची माहिती माजी आमदार कार्लुस अल्मेदा यांनी दिली. स्व: मनोहर पर्रिकर म्हणजे पूर्वी गोव्यात भाजप होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात भाजपला सन्मान होता.ते असते तर सरकारी नोकऱ्यात भष्ट्राचार झाला नसता. मात्र सध्याच्या भाजपवाल्यांनी पक्षाची दुर्दशा करून ठेवल्याने मी भाजपला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विरोधी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहे.

पूर्वी युवा कॉंग्रेसमध्ये (Congress) मी कार्य केले असल्याने संपूर्ण मुरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला विजयासाठी कार्य करणार असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, काँग्रेस अवश्य बाजी मारणार असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली.

दाजी साळकर याने माझ्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतः किती प्रामाणिक आहे ते जनतेसमोर मांडावे. दाजी साळकर याने वास्कोचे ग्रामदेव दामोदर या सप्ताहात भ्रष्टाचार केला असल्याचा पुरावा माझ्याजवळ आहे. तसेच वास्को खारीवाडा येथील कोमुनिदाद जमिनीत दाजी साळकर यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. कोमुनिदादची जमीन सांभाळण्यासाठी साळकर यांना दिली होती. त्याने ती बेकायदेशीररित्या दिल्लीतील एका इमारत बांधकाम उद्योजकाला परस्पर विकून करोड रुपया बळकावलेले आहे, याचा सुद्धा पुरावा माझ्याजवळ असल्याची माहिती आल्मेदा यांनी देऊन, मी लवकरच जनते समोर ठेवणार असल्याची शेवटी त्यांने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

SCROLL FOR NEXT