Manohar International Airport : मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांनी उद्घाटन करून त्याचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे जाहीर केले आहे, तेच नाव वापरले जावे. त्याला मागेपुढे कोणतेच नाव जोडण्यात येऊ नये.
सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी जीजीआएएल कंपनीने तसेच कंपनीशी संबंधित असलेल्या विविध घटकांच्या आस्थापनांनी त्याच नावाचा उल्लेख सर्वत्र करावा, असे पत्र गोवा नागरी विमान उड्डाण खात्याचे संचालक डॉ. एस. शानभोग यांनी जीजीआयएएल कंपनीच्या सीईओला पाठवले आहे.
या विमानतळाला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याला केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच विधानसभेतही त्यासंदर्भातच ठराव मंजूर झालेला आहे. त्यामुळे या नावाव्यतिरिक्त त्याला इतर कोणत्याच नावाने संबोधले जाऊ नये.
कंपनीने त्यांच्याशी संबंधित असलेल्या विविध विमान कंपन्या व विमानतळाशी व्यवहार करताना त्याच्या मूळ नावानेच व्यवहार करावा.
या विमानतळाचे नाव ‘न्यू गोवा विमानतळ’ असा उल्लेख न करता ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा उल्लेख करण्यासाठी बंधनकारक आहे, असे शानभोग यांनी पत्रात म्हटले आहे. हा बदल करण्यास कंपनीला आठ दिवसांची मुदत दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.