Mankurad mango missing from Goa market Dainik Gomantak
गोवा

Goa Mango Market: 'मानकुराद'चा घमघमाट बाजारातून गायब! 'मालगेस' सह अन्य जातींच्या आंब्यांनी बाजार गजबजला

Mankurad Mango Season: फळांचा राजा मानला जाणारा 'मानकुराद' आंबा आता बाजारातून जवळपास गायब झाला आहे. डिचोली बाजारातील 'मानकुराद'चा घमघमाटही आता ओसरला असून, बाजारात अन्य जातींच्या आंब्यांचे वर्चस्व वाढले आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: फळांचा राजा मानला जाणारा 'मानकुराद' आंबा आता बाजारातून जवळपास गायब झाला आहे. डिचोली बाजारातील 'मानकुराद'चा घमघमाटही आता ओसरला असून, बाजारात अन्य जातींच्या आंब्यांचे वर्चस्व वाढले आहे. यंदा मोसमाच्या सुरुवातीला 'मानकुराद'चा भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता, बाजारात या आंब्यांचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीला त्यांचा दर अडीच हजार रुपये डझन इतका होता.

मात्र, नंतर बंपर उत्पादनामुळे बाजारातील आवक वाढत गेली आणि त्यानुसार मानकुराद'चा भावही घसरत गेला. आठवडाभरापूर्वी बाजारात 'मानकुराद'ची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या 'मानकुराद'चा दर डझनामागे २०० ते ३०० रुपयांपर्यंत खाली आला होता.

'मानकुराद' स्वस्त झाल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांनी या 'मालगेस', 'पायरी' आंब्यांची बाजारात आवक 'मानकुराद'चा हंगाम संपत असताना आता स्थानिक 'मालगेस', 'पायरी', 'साकरी' तसेच रत्नागिरीतील 'हापूस' आणि अन्य जातींच्या आंब्यांची बाजारात आवक सुरू झाली आहे. या आंब्यांचे दर तुलनेने परवडणारे असून सध्या ३०० ते ४०० रुपये डझन असा भाव आहे.

मात्र, या आंब्यांना 'मानकुराद सारखी चव नसल्याने त्यांना तितकी मागणी नसल्याचे बाजारातील विक्रेते प्रेमानंद यांनी सांगितले. लवकरच राज्याबाहेरील 'नीलम' आंबाही मोठ्या प्रमाणात वाजारात दाखल होण्याची शक्यता असल्याचे संकित विक्रेत्यांकडून मिळत आहेत.आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतला, शेवटच्या टप्प्यात तर अनेक ग्राहकांना 'मानकुराद' ची विशेष आकर्गणही राहिले नव्हते. सध्या अपवादात्मक प्रमाणातच हा आंबा बाजारात दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT