Mango Pickle Recipe: तोंडाला पाणी सुटेल असं पारंपारिक 'कैरीचं लोणचं'; घरच्या घरी बनवा, वाचा सोपी रेसिपी

Sameer Amunekar

योग्य कैरीची निवड

लोणचे बनवण्यासाठी नेहमी कडक आणि ताजी कैरी निवडा. शक्य असल्यास 'राजापुरी' कैरी वापरा, कारण त्यात गर जास्त असतो. कैरी स्वच्छ धुवून, पुसून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

फोडी पूर्णपणे सुकवणे

कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद लावून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सुटलेले पाणी काढून टाका आणि या फोडी ३-४ तास कडक उन्हात किंवा पंख्याखाली कापडावर पसरवून ठेवा. फोडींमधील ओलावा पूर्ण गेल्याने लोणचे वर्षभर टिकते.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

घरगुती मसाला तयार करणे

बाजारातील रेडिमेड मसाल्यापेक्षा घरी बनवलेला मसाला उत्तम चव देतो. यासाठी मोहरीची डाळ (मोहरी डाळ), मेथी दाणे, बडीशेप, हिंग आणि लवंग-मिरी हलकी भाजून जाडसर वाटून घ्या. यामुळे लोणच्याला पारंपारिक सुवास येतो.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

तेलाचे अचूक प्रमाण आणि तापमान

लोणच्यासाठी शक्यतो शेंगदाणा तेल किंवा मोहरीचे तेल वापरा. तेल कडक गरम करा आणि त्यात हिंग-हळद टाकून ते पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम तेल कधीही मसाल्यात ओतू नका, अन्यथा मसाला जळू शकतो आणि लोणचे काळे पडू शकते.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

चवीचे संतुलन

मसाल्यामध्ये कश्मीरी लाल तिखट (रंगासाठी) आणि बेडगी तिखट यांचे मिश्रण वापरा. चवीनुसार भरपूर मीठ टाका, कारण मीठ हे नैसर्गिक 'प्रिझर्व्हेटिव्ह' म्हणून काम करते. काही लोक चव वाढवण्यासाठी त्यात थोडा गुळही घालतात.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

बरणी भरण्याची पद्धत

लोणचे भरण्यासाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा. बरणी स्वच्छ आणि कोरडी असावी. लोणचे बरणीत भरल्यानंतर त्यावर किमान १-२ इंच तेलाचा थर असावा. तेलामुळे लोणच्याचा हवेपाशी संपर्क तुटतो आणि बुरशी लागत नाही.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

मुरण्याची प्रक्रिया

लोणचे भरल्यानंतर बरणीचे तोंड सुती कापडाने बांधून ठेवा. दिवसातून एकदा कोरड्या चमच्याने लोणचे वर-खाली हलवा. साधारण ८-१० दिवसांत कैरीच्या फोडी मऊ होतात आणि लोणचे खाण्यासाठी तयार होते.

Mango Pickle Recipe | Dainik Gomantak

चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत म्हणून रोज करा 'हे' बदल

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा