Manikrao Thakre Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

Manikrao Thakre: काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, सध्‍या प्रत्‍येक पक्ष आपापल्‍या परीने जिल्‍हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाने (आरजीपी) युतीसंदर्भात संपर्क साधल्‍यास त्‍यांचे मुद्दे लक्षात घेतले जातील. त्‍यानंतर प्रदेश काँग्रेसच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांसोबत त्‍याबाबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना स्‍पष्‍ट केले.

युतीसंदर्भात आपली गोवा फॉरवर्ड पक्षासोबत बोलणी सुरू आहे. काँग्रेस, आप या पक्षांच्‍या नेत्‍यांशीही यासंदर्भात चर्चा केली जाईल. म्‍हादई, जमीन रक्षण आणि पोगो विधेयक या आरजीपीच्‍या तीन मुद्द्यांबाबत काँग्रेस, आपची भूमिका आरजीपीप्रमाणेच असेल, तर या पक्षांशी युती करण्‍यास आपण तयार असल्‍याचे वक्तव्‍य आरजीपीचे अध्‍यक्ष मनोज परब यांनी शनिवारी केले.

याबाबत काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, सध्‍या प्रत्‍येक पक्ष आपापल्‍या परीने जिल्‍हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्‍याच पद्धतीने काँग्रेसनेही राज्‍यभरात काम सुरू केले आहे.

काँग्रेस आरजीपीसोबत युती करेल की नाही, याचे उत्तर तूर्तास देता येणार नाही. आरजीपीचे नेते युतीबाबत चर्चा करण्‍यासाठी आल्‍यानंतर त्‍यांचे मुद्दे विचारात घेतले जातील. त्‍यानंतर त्‍यांच्‍या मुद्द्यांबाबत प्रदेश काँग्रेसच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांसोबत चर्चा केली जाईल आणि नंतरच युतीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

युतीस आम्ही तयार ः परब

गोवा राज्याच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या म्‍हादई, जमीन रक्षण आणि पोगो विधेयकासंदर्भात रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाने (आरजीपी) मांडलेली भूमिका राज्‍यातील विरोधी पक्षांना मान्‍य असेल, तर त्‍यांच्‍यासोबत युती करण्‍यास आम्ही तयार आहोत. युतीबाबत आम्ही गोवा फॉरवर्ड पक्षासोबत चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांसोबतही लवकरच चर्चा सुरू केली जाईल, असे ‘आरजीपी’चे अध्‍यक्ष मनोज परब यांनी शनिवारी स्‍पष्‍ट केले.

पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही टॅक्‍सीमालकांना पाठिंबा दिला. त्‍यामुळे सरकारने टॅक्‍सीमालकांना न्‍याय दिला. आगामी काळात सर्व विरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली येऊन काम केल्‍यास त्‍याचा फायदा विरोधकांनाच होणार आहे. त्‍यामुळेच सर्व प्रकारचा अहंकार बाजूला ठेवून विरोधी पक्षांसोबत युती करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

६, ७ रोजी ठाकरे गोव्‍यात!

येत्‍या ६ ऑक्‍टोबरला आपण गोव्‍यात येणार आहे. ६ आणि ७ रोजी प्रदेश काँग्रेसच्‍या नेत्‍यांशी आगामी जिल्‍हा पंचायत निवडणुकांच्‍या अनुषंगाने बैठका घेण्‍यात येणार आहेत. शिवाय भाजप सरकारविरोधात काँग्रेसने सुरू केलेल्‍या ‘व्‍होटचोरी’ मोहिमेला अधिक गती देण्‍यासंदर्भात कार्यककर्त्यांशी चर्चा करणार असल्‍याचेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT