Mangeshi accident news Dainik Gomantak
गोवा

Mangeshi Circle Accident: बस टेम्पोमध्ये जोरदार धडक! मंगेशी सर्कलपाशी वाहतूक ठप्प; 10 जण जखमी Video

Goa Accident: मंगेशी येथील सर्कलजवळ संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात प्रवासी मिनीबस आणि दूधवाहू टेंपो यांच्यात जोरदार धडक झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडकई: मंगेशी येथील सर्कलजवळ संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात प्रवासी मिनीबस आणि दूधवाहू टेंपो यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दहाजण जखमी झाले असून, जखमींमध्ये दोन्ही वाहनांचे चालकही आहेत. सर्व जखमींना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

माहितीनुसार, फोंड्याहून मडकईकडे जाणारी जीए०२ टी ४९३३ क्रमांकाची मिनीबस आणि पणजीहून फोंड्याकडे येणारी जीए०२ टी ७२३५ क्रमांकाची दूधवाहू टेंपो यांच्यात हा अपघात झाला.

धडक इतकी जबरदस्त होती की बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला. जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून, काहींना गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे.अपघातामुळे मंगेशी सर्कल परिसरात वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांच्या प्रयत्नामुळे काही वेळात वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या घटनेनंतर म्हार्दोळ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केला असून, अपघाताची नेमकी कारणे शोधली जात आहेत.स्थानीय रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीने मदत पोहोचवली, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा परिणाम टाळला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

Ravi Naik : ‘असुनी नाथ मी अनाथ'! अजूनही फोंडावासीयांना ’पात्रांव’ आमच्यात नाहीत, हे खरेच वाटत नाही..

SCROLL FOR NEXT