Tree cutting Dainik gomantak
गोवा

Illegal Cutting Trees: कुंकळये ग्रामस्थांनी रोखली झाडांची बेकायदा कत्तल

पंचायत क्षेत्रात अनेक बेकायदा कामे घडत असूनही यावर कारवाई होत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Cutting Trees : गोवा वन खात्याने ‘स्टे ऑर्डर’ बजावलेली असतानाही शनिवारी (ता. २२) संधी साधून वेलिंग-प्रियोळ-कुंकळये ग्रामपंचायत क्षेत्रातील मंगेशी-कुंकळये जंक्शनजवळील बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करण्यात येत होती. गावातील लोकांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी बेकायदा वृक्षतोड रोखली.

जेसीबी तसेच लाकूड कापण्याच्या यंत्राच्या साहाय्याने गुपचूपपणे वृक्षतोड सुरू होती. जागरूक नागरिकांनी वेळीच दखल घेत ही वृक्षतोड रोखली.

यावेळी शिवदास नाईक यांनी झाडे कापण्यास मनाई असल्याची ऑर्डर दाखविली. सुरेश नाईक, वेद रानडे, विकी जल्मी, गौरेश गावडे, रूपो जल्मी, रोहित जल्मी, स्वप्निल भंडारी आणि सरगम गावडे यावेळी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींकडून असहकार्य

गौरेश गावडे यांनी स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर टीका करताना म्हटले, की आज जनतेने निवडून आणलेले लोकप्रतिनिधी हे लोकांबरोबर राहून गाव वाचविण्याचा प्रयत्न करत नाहीत.

वेलिंग-प्रियोळ-कुंकळये ग्रामपंचायत सरपंच तसेच इतर लोकप्रतिनिधींकडूनही स्थानिकांना सहकार्य मिळत नाही. पंचायत क्षेत्रात अनेक बेकायदा कामे घडत असूनही यावर कारवाई होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT