Shakti Kapoor | Madhurani Prabhulkar  Dainik Gomantak
गोवा

Shakti Kapoor: मांद्रेचा 'नारी शक्ती' उत्सव!! 'अरुंधती' झाली 'मैत्रीण' तर शक्ती कपूरने दिला 'बॉलिवूड तडका'

Shakti Kapoor Goa: प्रमुख पाहुण्यांनी यावेळी उपथितांशी संवाद साधला आणि पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडला

Akshata Chhatre

Shakti Kapoor in Goa

मांद्रे: महिला दिना निमित्त ८ मार्च रोजी मांद्रे येथे आमदार जीत आरोलकर यांच्यामार्फत नारी शक्ती क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या समारोप सत्राला आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि बॉलीवूड सिने अभिनेते शक्ती कपूर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी उपथितांशी संवाद साधला आणि पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडला.

मांद्रेच्या लोकांनी नोंदवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमदार जीत आरोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक जोमाने सराव करून अधिकाधिक बक्षिसं जिंकण्याचा उत्साह दिला. महिला वेळात-वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, स्पर्धेत सहभागी झाल्या याबद्दल आरोलकर यांनी त्यांचं कौतुक केलं. "तुम्ही माझ्या बहिणी आहात, आणि कायम अशाच माझ्या पाठीशी राहा असं आरोलकर म्हणालेत.

शक्ती कपूरची उपस्थिती ठरली विशेष

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते शक्ती कपूर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलावल्याबद्दल त्यांनी आमदार जीत आरोलकर यांचे आभार मानलेच मात्र सोयाबीतच पुढच्या वर्षी पुन्हा एकदा मांद्रे येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूर सुद्धा सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे, जमल्यास तिला देखील घेऊन येता आलं तर उत्तम असं म्हणत शक्ती कपूर यांनी मुलीसोबत पुन्हा गोवा वारी करण्याची इच्छा दाखवली. श्रद्धा महिलांचा भरपूर आदर करते आणि देवाच्या मनात असेल तर ती नक्कीच पुढच्या वर्षी येईल असं कपूर म्हणालेत.

मधुराणी म्हणाली, "संसाराचे व्याप विसरून आलात, याचं कौतुक!"

काही दिवसांपूर्वी मराठी मालिकांमध्ये सगळ्यात गाजणारं नाव होतं आई कुठे काय करते. यामध्ये अरुंधतीची भूमिका केलेली मधुराणी प्रभुलकर देखील महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती.

महिलांसाठी असे मैदानी खेळ आयोजित करून त्यांना मैदानात आणण्यासाठी तिने आमदारांचं कौतुक केलं आणि महिला देखल घरचा व्याप विसरून काही काळासाठी का होईना मैदानी खेळ खेळण्यासाठी आल्या म्हणून तिने महिलांचं कौतुक केलंय. वर्षातून एकदा नाही तर दिवसांतून एकदा तरी किमान स्वतःसाठी वेळ काढून जागा, स्वतःच्या आवडी जपा असे आवाहन तिने महिलांना केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT