Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

Morjim: लाईट नाही म्हणून मध्यरात्री केला आमदाराला फोन; जीत आरोलकरांची थेट पोलिसांत तक्रार

Morjim, Mandrem: गेल्या चार दिवसांपासून आयलिन चौकशीसाठी पोलिस स्थानकात हजेरी लावत आहेत.

Pramod Yadav

Morjim, Mandrem

मांद्रे मतदारसंघातून एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. घरात वीज नाही म्हणून रात्री एकच्या सुमारास मोरजी येथील एका व्यक्तीने थेट आमदार जीत आरोलकरांना फोन केला.

व्यक्तीने घरी वीज नसल्याची समस्या सांगितली असता संतापलेल्या आमदार जीत आरोलकर यांनी थेट या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. शनिवारी (दि.११ मे) हा प्रकार घडला.

मोरजीच्या सरपंचासह इतर अनेकजण यावेळी आयलिन यांच्या समर्थनात हजर होते.

मोरजीचे सरपंच उमेश गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात वीज नाही म्हणून आयलिन यांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना रात्री एकच्या सुमारास फोन केला. आरोलकर लोकप्रतिनिधी असल्याने सामान्य नागरिकांना त्यांना फोन करण्याचा अधिकार आहे.

पण, फोन केल्याने काही गैरसमजातून आरोलकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फोन केलेल्या आयलिन यांना चौकशीसाठी बोलावले.

गेल्या चार दिवसांपासून आयलिन चौकशीसाठी पोलिस स्थानकात हजेरी लावत आहेत. या चार दिवसात झालेल्या विविध महोत्सवांना त्यांना हजेरी लावता आली नाही, तसेच, पोलिसांनी बोलावणी धाडल्याने आयलिन घाबरल्याचे गडेकर म्हणाले.

यासर्व प्रकाराबाबत मोरजीच्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, लोक प्रतिनिधींनी अशाप्रकारे वागणे चुकीचे असल्याचे मत स्थानिकांनी नोंदवले.

लोकप्रतिनिधी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी असतात, कोणी समस्या उपस्थित केल्यावर तक्रार करणे योग्य नाही. आयलिन यांनी फोन संभाषणात देखील काही चुकीचे शब्द वापरले नाहीत, असा दावा सरपंच गडेकर यांनी केला.

तसेच, आमदार आरोलकर यांनी देखील हा विषय समाप्त करावा, आम्हालाही तो वाढविण्याची इच्छा नाही, असे आवाहन देखील गडेकर यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

Sal Electricity Problem: अख्खी रात्र काळोखात! गोव्यातील 'या' गावामध्ये 15 तास वीज गायब; नागरिक हैराण

Porvorim Road: जुना रस्ता सुस्थितीत, नव्या रस्त्याची चाळण! पर्वरीतील सावळागोंधळ, पावसाने खड्ड्यांचे साम्राज्य

Mega Project Goa: गोव्यात येणार 800 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! पाण्याची कमी तरी बड्या प्रकल्पांना पायघड्या; अजून 2 गृहप्रकल्प होणार

SCROLL FOR NEXT