Jit Arolkar road repair  Dainik Gomantak
गोवा

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Mandrem MLA Jit Arolkar roads: मांद्रे मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार जीत आरोलकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली

Akshata Chhatre

मांद्रे: वीज विभागाने विभागाने केल्या काही घेतलेल्या उपक्रमांमुळे राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे, पावसात ही स्थिती आणखीन वाईट झाली आहे. इतर ठिकाणांप्रमाणे मांद्रे मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार जीत आरोलकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. रस्त्यांच्या या दुर्दशेमागे अनेक कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर हे सर्व रड्डे 'हॉट मिक्स डांबरीकरण' करून पुन्हा सुस्थितीत आणले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

विकासकामांमुळे रस्त्यांची दुर्दशा

आमदार आरोलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मांद्रे मतदारसंघातील रस्ते खराब होण्यामागे विकासाची कामेच मुख्य कारण आहेत. जनतेला चांगल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी भूमिगत वीज केबल टाकणे आणि नवीन जलवाहिन्या बसवणे आवश्यक होते.

या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदावे लागले, ज्यामुळे त्यांची अवस्था खराब झाली आहे. जनतेलाही ही कारणे माहीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

दिवाळीनंतर रस्ते चकाचक

खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. दिवाळीचा सण संपल्यानंतर खराब झालेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जाईल आणि त्यांना पुन्हा डांबरीकरण करून वाहतुकीसाठी योग्य बनवले जाईल, असे आश्वासन आरोलकर यांनी दिले. तोपर्यंत नागरिकांनी या परिस्थितीकडे समजून घ्यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT