Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Mandrem Assault Case: मालमत्तेच्या जुन्या वादातून एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Sameer Amunekar

मांद्रे : सावंतवाडा परिसरात मालमत्तेच्या जुन्या वादातून एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जमिनीचा हा जुना वाद आता हिंसक वळणावर पोहोचल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रस्त्यात अडवून केला जीवघेणा हल्ला

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंबासह जात असताना संशयित सहा जणांच्या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र त्याचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले.

या सहा जणांच्या टोळक्याने ज्येष्ठ नागरिक, त्यांची पत्नी आणि मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हल्ला सुरू असताना पीडित व्यक्तीकडील मोबाईलही आरोपींनी हिसकावून घेतला.

मांद्रे पोलिसांनी पीडित ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून सहा संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सावंतवाडा भागातील हा मालमत्तेचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे समजते.

पोलीस आता या प्रकरणातील सहाही संशयितांचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी तपासल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT