Goa Loksabha Election 2024 Dainik Gomantak
गोवा

'40 वर्षे सेवा केली, श्रीपाद भाऊनी आता विश्रांती घ्यावी'; दयानंद सोपटे लोकसभेसाठी इच्छुक

श्रीपाद भाऊनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी देण्याची गरज आहे - दयानंद सोपटे

Pramod Yadav

Goa Loksabha Election 2024: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. विविध राजकीय पक्षाचे माजी आमदार, नेते उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करत आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर गोव्यासाठी आता मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. शिवाय श्रीपाद भाऊंनी आता विश्रांती घ्यावी असा सल्लाही सोपटे यांनी दिला आहे.

काय म्हणाले दयानंद सोपटे?

पक्षाने मला संधी दिल्यास मी उत्तर गोवा लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. मला उत्तर गोवा मतदारसंघ नवा नाही. श्रीपाद भाऊनी गेली 40 वर्षे पक्ष, गोव्यासह देशाची सेवा केलेली आहे. आता सगळ्यांनाच वाटतं की श्रीपाद भाऊंना आता विश्रांतीची गरज आहे.

श्रीपाद भाऊनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी देण्याची गरज आहे, असे मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले.

उत्तर गोव्यातील जागेसाठी अद्याप कोणत्याच पक्षाकडून ठोस हालचाल होताना दिसत नाही. भाजपकडून नीलेश काब्राल यांच्या नावाची चर्चा होते तर कधी लक्ष्मिकांत पार्सेकर यांचे नाव समोर येते. श्रीपाद नाईक यांच्या नावाबाबत सर्वत्र साशंकता व्यक्त केली जात असल्याने उत्तर गोव्यात भाजपचा नवा चेहरा कोण असणार याबाबत सध्या उत्सुकता आहे.

दरम्यान, गोव्यात मनोज परब यांच्या आरजी पक्षाने देखील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे यावेळी राज्यात लोकसभेसाठी वेगळी चुरस पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT