Madrem River Gomantak Digital Team
गोवा

Mandrem News : मांद्रे येथे नदीत उभे राहिले बांधकाम !

संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem News : मांद्रे पंचायत क्षेत्रातील पाट्याचे बाग-मधलामाज परिसरात नदीतच बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामाविषयी अनेक तक्रारी असल्या तरी सर्व संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.नदीत उभारण्यात येत असलेले हे बांधकाम बेकायदा असून सीआरझेड नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

या बांधकामामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. तसेच नदीकिनारी भागातील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुलाला खेटूनच हे बाधकाम झाले तरीही बांधकाम खात्याने गप्प राहणे पसंत केले आहे.

याबद्दल ‘स्वराज’चे कार्यकारी अध्यक्ष जगन्नाथ पार्सेकर यांना विचारले असता त्यांनी सागितले की, नदीकिनारी बांधकाम करताना सीआरझेड अधिनियमांतर्गत परवानगी आवश्यक असतानाही ती घेतलेली नाही. हे बांधकाम भरतीरेषेच्या व्याप्तीत येत आहे. तसेच ही जमीन ‘ना बांधकाम क्षेत्र’ (एनडीझेड) या प्रकारात मोडत आहे.

याबद्दल ‘स्वराज’ संस्थेने जीसीझेडएमएसह जिल्हाधिकारी आणि अन्य सर्व संबधितांकडे तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीची दखल जीसीझेडएमएच्या सदस्य सचिव डॉ. गीता नागवेकर यांनी घेतली असून नियमभंग प्रकरणी प्रकाश नेनवानी, किशन प्रभुदास नेनवानी, रेणू किशन नेनवानी आणि विनोद किशन नेनवानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याप्रकरणी निश्चितच कारवाई होईल, असा विश्वास पार्सेकर यांनी व्यक्त केला आहे.

सातत्याने या प्नकरणाचा पाठपूरावा २०२२ पासून सुरू आहे. अजूनही काही प्रकरणे आहेत त्याविरोधात ‘स्वराज’ कायदेशीर लढा देत आहे. डोंगरकापणीचे जे प्रकार घडत आहेत, त्याविरोधातही नागरिकांनी ‘स्वराज’कडे तक्रारी केल्यानंतर योग्य त्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहोत. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास योग्यवेळी आम्ही ही प्रकरणे न्यायालयातही नेण्याचा निर्णय घेतला आहे. गावाच्या हितासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे.

जगन्नाथ पार्सेकर, ‘स्वराज’चे कार्यकारी अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge Accident: ओव्हरटेक बेतलं जिवावर! मांडवी पुलावर टॅक्सी आणि दुचाकीचा भीषण अपघात; मुंबई आणि रोहतकच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Horoscope: धनलाभाचे योग आणि जुनी गुंतवणूक ठरणार फायदेशीर! पैशांच्या बाबतीत मंगळवार 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

SCROLL FOR NEXT