Mandovi River Pollution Dainik Gomantak
गोवा

Mandovi River Pollution: मांडवी नदी प्रदूषणावर हायकोर्टात सुनावणी; खाडी परिसरातील प्रत्येक आस्थापनाची तपासणी करण्याची सूचना

Mandovi River Sewage Pollution: मांडवी नदीतील मैला प्रदूषणाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी सांतइनेज आणि रुअ द ओरेम या खाडींसह आजूबाजूच्या सर्व निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे अत्यावश्यक आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मांडवी नदीतील मैला प्रदूषणाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी सांतइनेज आणि रुअ द ओरेम या खाडींसह आजूबाजूच्या सर्व निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणे अत्यावश्यक आहे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस अ‍ॅमिकस क्युरी (न्यायमित्र) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

मळा तलावातील मासे मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाला सहकार्य करणारे न्यायमित्र अ‍ॅड. नायजेल फर्नांडिस यांनी सुनावणीदरम्यान ही मागणी लावून धरली.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत प्रदूषणाचा नेमका उगम सापडलेला नाही. मात्र, रुअ द औरेम खाडी, सांतइनेज खाडी आणि पणजी मार्केट परिसर हे तीन संभाव्य स्रोत असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. फर्नांडिस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, हे जलस्रोत वेगळे नसून एकमेकांशी जोडलेले आहेत. रुअ द औरेम खाडी थेट मांडवी नदीला मिळते, तर ताळगाव येथून सुरू होणारी सांतइनेज खाडी कांपाल आणि ईएसजी परिसरालगत मांडवीत विलीन होते.

तपासणीचा परिघ वाढवा

सध्या न्यायालयाचे आदेश केवळ मांडवी नदीच्या जलगुणवत्तेच्या तपासणीपुरते मर्यादित आहेत. परंतु मांडवीत प्रदूषण पोहोचण्यापूर्वी या उपखाड्यांमध्ये ते कुठे निर्माण होते, हे शोधण्यासाठी तपासणीचा परीघ वाढवणे गरजेचे आहे. खाड्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सर्व घरे, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची कसून पाहणी करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत. या आस्थापनांचे सांडपाणी थेट खाडीत सोडले जात आहे का, तेथील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित आहे का आणि ते भूमिगत गटार योजनेशी जोडलेले आहेत का, याची खातरजमा पथकांनी प्रत्यक्ष भेट देऊन करावी, अशी शिफारस फर्नांडिस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT