Sunburn 2024 Canva
गोवा

Sunburn Festival: 'संस्कृती बिघडत असल्याचे बोलणाऱ्यांनी जाणून घ्यावे की..', भाजप प्रवक्त्यांचे 'सनबर्न'बाबतचे मत वाचा

Sadetod Nayak Sunburn Festival 2024: कोणत्याही स्थितीत आम्हाला हा ‘इडीएम’ नको. सरकारने हा महोत्सव लवकर रद्द करावा, अन्यथा आम्ही पेडण्यात जनआक्रोश आंदोलन उभे करणार आहोत, असा इशारा मांद्रेचे पंच अमित सावंत यांनी दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Protest Against Sunburn Festival 2024 Sadetod Nayak

पणजी: एकीकडे ‘सनबर्न’ची तिकीट विक्री सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे पेडण्यात सनबर्न आयोजनावरून वाद कायम आहे. संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू होताच पेडणेवासीयांनी ‘सनबर्न नको’ची हाक दिली आहे. कोणत्याही स्थितीत आम्हाला हा ‘इडीएम’ नको. सरकारने हा महोत्सव लवकर रद्द करावा, अन्यथा आम्ही पेडण्यात जनआक्रोश आंदोलन उभे करणार आहोत, असा इशारा मांद्रेचे पंच अमित सावंत यांनी दिला आहे.

‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात पेडणेवासीयांनी सनबर्न महोत्सव आयोजनाला जोरदार विरोध केला. सरकार पक्षाच्यावतीने भाजप प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर यांनी बाजू मांडली, तर मांद्रेचे पंच अमित सावंत आणि पत्रकार किशोर नाईक गावकर यांनी पेडणेवासीयांची भूमिका स्पष्ट केली.

सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले की, २००७ मध्ये राज्यात सनबर्न सुरू झाला होता. हा महोत्सव आता एक ‘ब्रँड’ बनला आहे. जे लोक सनबर्नमुळे संस्कृती बिघडत असल्याचे बोलतात त्यांनी प्रथम जाणून घ्यावे की सनबर्नचे पास १० हजार रुपयांपासून सुरू होतात. हे पास सामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे राज्यातील सामान्य जनता यामध्ये जाण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही.

पेडणेकरांची मतेही महत्त्वाची; सिद्धार्थ कुंकळकर

वैयक्तिकरित्या मला ‘सनबर्न’मधील कर्कश संगीत आवडत नाही. मी काही चित्रपटांची जुनी गाणी ऐकतो. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. सरकार जर कुणालाही परवानगी देत असेल, तर ते नियमाच्या अखत्यारीतच असते हेही लक्षात घ्यायला हवे. पेडणेकरांचा विचार लक्षात घेऊनच सरकारने निर्णय घ्यावा, असे मला वाटते.

सरकारची भूमिका संभ्रमात टाकणारी

किशोर नाईक गावकर यांनी सांगितले की, सनबर्न पर्यटनासाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे हे मान्य, परंतु त्याची जागा नेहमीच चुकीची निवडली आहे. आधी तो किनारी भागात आयोजित होत होता आणि आता सनबर्न ग्रामीण भागात पोहोचला आहे. सरकारला सनबर्न हवे की नाही हे प्रथम सरकारने ठरवावे. सरकारची भूमिकाच लोकांना संभ्रमात टाकणारी आहे. सनबर्नचे आयोजन आम्ही धारगळसारख्या ग्रामीण भागात मान्यच करू शकत नाही.

माझा सनबर्नला सुरवातीपासून विरोध होता आणि भविष्यातही राहणार आहे. ‘सनबर्न गोवा’ आणि भाजप संस्कृती हे समीकरणच वेगळे आहे. सनबर्न हा दृष्ट प्रवृत्तीचा फेस्टिव्हल आहे. पेडण्यातील जनता याचा विरोध करणार असून गोव्यात देखील सनबर्नला विरोध वाढणार हे निश्चित.
- अमित सावंत, मांद्रे पंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT