रमेश तवडकर Dainik Gomantak
गोवा

विधिकारांना 365 दिवस काम बंधनकारक: रमेश तवडकर

ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालयाच्या राजयोग भवनाचे उद्‌घाटन

दैनिक गोमन्तक

काणकोण: विधानसभेचे कामकाज हे 45 दिवसांपर्यंत सीमित नसून विधिकारांना 365 दिवस काम करणे बंधनकारक आहे, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या काणकोण येथील राजयोग भवनाचे खालवडे येथे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी ब्रम्हकुमारी पुणे विभागाच्या प्रमुख राजयोगिनी सुनंदा बहेनजी, सिंधुदुर्ग प्रभारी शोभा बहेनजी,काणकोणच्या प्रभारी सुरेखा बहेनजी, चंदिगडचे प्रसिद्ध गायक जयगोपाल लथुरा,निवृत्त मुख्याध्यापक उल्हास भाटीकर,श्रीस्थळचे सरपंच रामू नाईक उपस्थित होते.

तवडकर म्हणाले,की देवावरील श्रद्धा व जनतेच्या विश्वासाच्या बळावर चार वेळा आमदार झालो. या कार्यक्रमाला आमदार किंवा सभापती म्हणून नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहिलो आहे. समाजात नकारात्मक वृत्ती बळावली आहे, त्यामुळे मन खिन्न होते. आजही निवारा नसल्याने समाजात दुःख आहे ते दूर करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे आव्हान स्वीकारले आहे, असे तवडकर यांनी सांगितले.

पुणे प्रभारी सुनंदा बहेनजी यांनी सांगितले,की राजयोग भवन ही पाणपोई आहे. तणावमुक्त जीवन कसे जगावे याचे धडे येथे दिले जातात. जीवन व्यसनमुक्त,क्रोधमुक्त, तणाव मुक्त होण्यासाठी ध्यानयोग महत्वाचा आहे. सरपंच रामू नाईक यांनी ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या काणकोण शाखेला पंचायतीतर्फे सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. निवृत्त मुख्याध्यापक उल्हास भाटीकर यांचेही भाषण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT