Goa Crime | Arrested  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : गोवा विद्यापीठातील मुलींसोबत अश्लील वर्तणूक प्रकरणी कोलवाळमधील एकजण गजाआड

आगशी पोलिसांनी कोलवाळ मधील एकाला अटक केली आहे.

Kavya Powar

Goa Crime News : गोव्यात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या चुकीच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गोव्यात महिलांशी कोणते तरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करून त्यांच्यासमोर अश्लील हावभाव करण्याच्या आणि त्यांच्यासमोर जाणीवपूर्वक आपले खाजगी अवयव दाखवण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून घडत आहेत. यासंदर्भात आगशी पोलिसांनी कोलवाळ मधील एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार गोवा विद्यापीठाच्या परिसरात घडला. विद्यापीठात शिकणाऱ्या मुली रस्त्याने चालत असल्या की एकजण त्यांच्याजवळ येऊन दिशा विचारण्याच्या बहाण्याने किंवा कोणतीही मदत मागण्याच्या बहाण्याने त्या मुलींजवळ येत असे आणि त्यानंतर मुली त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना तो त्याची पॅंट खाली करून त्या विद्यार्थिनींसमोर अश्लील हावभाव करत आपले खाजगी अवयव त्यांना दाखवत असे.

अशा अनेक घटना या काही दिवसांमध्ये घडल्या. पोलीस विभागातर्फे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 'महिला सुरक्षा' कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली.

या संपूर्ण प्रकरणाबाबत विद्यार्थिनींनी पुढे येत त्या माणसाबाबत पोलिसांना सर्व प्रकार सांगून तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सापळा रचत कोलवाळमध्ये राहत असलेल्या 39 वर्षीय विराज चारी याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

शाळा सुटली, पण घर गाठण्यापूर्वीच काळ आला! 6 वीतील चिमुरडीवर अ‍ॅसिड फेकून नराधमानं काढला पळ; महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा

SCROLL FOR NEXT