Mysterious Death Mandovi Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Death: रात्री कॅसिनोमध्ये गेला, फुटपाथवर झोपला; सकाळी मांडवीत सापडला मृतदेह

Mandovi River Dead Body: नदीकिनारी मासेमारी करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहिली आणि त्याला वाचवण्यासाठी तात्काळ धाव घेतली

Akshata Chhatre

Panaji Casino Incident: मांडवी नदीकिनारी, कॅसिनोसमोरच्या फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीचा नदीत पडून बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवार (२५ जून) रोजी पणजी येथे घडली. सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नदीकिनारी मासेमारी करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहिली आणि त्याला वाचवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतरही त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आले नाही.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्या मनगटावर कॅसिनोमध्ये प्रवेशासाठी दिलेला 'एन्ट्री बेल्ट' होता. त्यामुळे तो रात्री उशिरापर्यंत कॅसिनोमध्ये गेला असावा किंवा तेथीलच पर्यटक असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तो फुटपाथवर झोपलेला असतानाच तोल जाऊन नदीत पडला असावा, असा अंदाज आहे.

स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...

सकाळच्या वेळी नदीकिनारी मासेमारी करत असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहिली. त्यांनी लगेचच त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तातडीने मदत दिली, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो व्यक्ती बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पणजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नदीकिनारी आणि विशेषतः कॅसिनो परिसरातील सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT