Representative Image Of Man Speaking On Mobile Ref. Image
गोवा

Tragic Incident Goa: फोनवर बोलताना नाही राहीले भान, टेरेसवरुन पाय घसरुन गोव्यात तरुणाचा मृत्यू

Goa News: बोलत असताना त्याचा टेरेसवरुन पाय घसरला आणि तो खाली पडला. कमलेशला गंभीर दुखापत झाली होती.

Pramod Yadav

बार्देश: फोनवर बोलताना पाय घसरुन टेरेसवरुन खाली पडल्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. काणका - बार्देश येथे मंगळवारी (२९ एप्रिल) रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. तरुणाला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

कमलेश कुमार (वय ३४, रा. काणका, बार्देश, मूळ गाझीपूर- उत्तरप्रदेश) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश काणका येथील घरी मंगळवारी रात्री फोन बोलत होता. बोलत असताना त्याचा टेरेसवरुन पाय घसरला आणि तो खाली पडला. कमलेशला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांना तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले.

कमलेशला उपाचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना कमलेशचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेत कोणत्याही प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार असल्याची शक्यता नाकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT