Calangute Crime Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: नवरा की रावण? पहाटेच्या सुमारास पत्नी आणि तीन लहान मुलांना काठीनं केली अमानुष मारहाण

Goa Crime News: जखमी चारही जणांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pramod Yadav

कळंगुट: पतीने पत्नी आणि तीन लहान मुलांना काठीने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गौरावाडो, कळंगुट येथून समोर आली आहे. कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी पतीला अटक केली आहे. भाड्याने घेतलेल्या खोलीत शनिवारी (०८ मार्च) पहाटे २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

मोहम्मद सलमान (३०) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. यात मोहम्मदची पत्नी साजिदा खातून (२२), आणि त्यांची ७ वर्षे, ५ वर्षे आणि ३ वर्षांची तीने मुले जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी चारही जणांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील लवेंडर व्हिलाजवळ मोहम्मद यांनी खोली भाड्याने घेतली होती. दरम्यान, शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास मोहम्मदने पत्नी साजिदा आणि तीन लहान मुलांना मारहाण केली. मोहम्मदने सुरुवातीला काठीने मारहाण केली आणि नंतर एक जड वस्तू पत्नीला भिरकावून मारली. यात पत्नीच्या डोक्याला इजा झाली. तसेच, तीन लहान मुले देखील गंभीर जखमी झालेत.

कळंगुट पोलिसांनी संशयित मोहम्मद सलमान याला अटक केली असून, त्याच्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मारहाणीमागील नेमके कारण अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, कळंगुट पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT