Great Khali In Goa: ग्रेट खली म्हणतो... 'विजय सरदेसाई गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा पॉवरफूल'

Great Khali In Goa: उद्घाटन कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करत असताना खलीने विजय सरदेसाई यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
The Great Khali Praises Vijay Sardesai
The Great Khali, Goa CM, Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: 'डब्ल्युडब्ल्युई'चा चॅम्पियन द ग्रेट खली ने गोव्यात केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. फातोर्डात एका महिलेना सुरु केलेल्या स्पोर्ट्स शॉपचे उद्घाटन खलीच्या हस्ते पार पडले. यावेळी खलीने आमदार विजय सरदेसाई गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापेक्षा पॉवरफूल असल्याचे व्यक्तव्य केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने (०८ मार्च) फातोर्डात येथे लाविना रॉड्रिग्ज यांनी सुरु केलेल्या स्पोर्ट्स शॉपचे ग्रेट खलीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांनी देखील उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक आणि महिलांनी देखील हजेरी लावली होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करत असताना खलीने विजय सरदेसाई यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

The Great Khali Praises Vijay Sardesai
Goa Murder Case: तंत्र - मंत्राच्या प्रथेतून 5 वर्षीय अमैराला संपवल्याचा संशय; क्रूर नवरा बायकोला फाशी देण्याची मागणी

"नव्याने उद्घान झालेल्या स्पोर्ट्स शॉपबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. गोव्यात येऊन तुम्हा लोकांना भेटता आले हे मी माझे भाग्य समजतो. स्थानिक आमदार विजय सरदेसाई खूप सक्रिय असतात. त्यांच्याबाबत मी खूप ऐकलं आहे. सरदेसाई गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षाही पॉवरफूल आहेत", असे खली म्हणाला. खालीने केलेल्या वक्तव्यावरुन सरदेसाई देखील काहीकाळ अचंबित झाल्याचे दिसून आले.

The Great Khali Praises Vijay Sardesai
Women's Day Goa: महिला दिन विशेष; मांद्रेच्या आमदाराने दोन हजार महिलांसाठी केला खास चिकनचा बेत

दरम्यान, खलीने केलेल्या वक्तव्यावरुन भारतीय जनता पक्ष आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. "खली फक्त शरीराने उंच आहे, पण राजकारणात अपरिपक्व असल्याचे त्याच्या वक्तव्यातून दिसून येते. त्याचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. मुख्यमंत्री किंग आहेत आणि त्यांची तुलना कोणशी होऊ शकत नाही", असे उत्तर भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रभारी उरफान मुल्ला यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com