Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'तुला काम देतो', सांगून व्हिडीओ केला रेकॉर्ड; लैंगिक अत्‍याचारप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

Mapusa Crime: पीडितेवर लैंगिक अत्‍याचार करताना त्‍या कृत्‍याचा व्‍हिडिओ काढून नंतर तो व्‍हायरल करण्‍याची धमकी देऊन ब्‍लॅकमेल करून तिच्याकडून ४० लाख रुपये उकळले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: चांगल्‍या पगाराची नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून म्‍हापसा येथील एका युवतीवर लैंगिक अत्‍याचार केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी राज प्रशांत ठाकूर याला गुरुवारी पोलिसांनी पुणे येथे जेरबंद करून नंतर गोव्यात आणून रीतसर अटक केली.

पीडितेवर लैंगिक अत्‍याचार करताना त्‍या कृत्‍याचा व्‍हिडिओ काढून नंतर तो व्‍हायरल करण्‍याची धमकी देऊन ब्‍लॅकमेल करून तिच्याकडून ४० लाख रुपये उकळले होते.

या प्रकरणी पोलिसांनी राज प्रशांत ठाकूरसह अँथनी डिसोझा, सिद्धार्थ कांबळी व ज्योती नागवेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अन्य संशयितांचा शोध चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देविदास पुढील तपास करीत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो यांनी या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली होती. पाजीफोड येथे त्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाला होता. पिडीत युवती ही इव्‍हेंटमध्‍ये काम करणारी हाेती.

म्‍हापसा येथील एका युवकाने तिची गाठ दोनापावला येथील एका युवकाकडे घालून दिली होती. आपल्‍याकडे काम केल्‍यास तुला लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असे सांगून त्‍या युवकाने तिला मडगावात आणून सुरुवातीला तिला कपडे काढायला लावून तिचा व्‍हिडिओ रिकॉर्ड केला होता.

कामाचा भाग म्‍हणून हा व्हिडिओ रिकॉर्ड होत असल्‍याचे तिला सुरुवातीला सांगण्‍यात आले होते. त्‍यानंतर हा व्‍हिडिओ व्‍हायरल केला जाईल असे सांगून त्‍या युवकाने पिडीतेला ब्‍लॅकमेल करण्‍यास सुरुवात केली होती.

चाळीस लाख उकळल्याची तक्रार

या युवकाने आपल्‍याला अन्‍य मुलींना कामासाठी आणण्‍यास भाग पाडले. या मुलींकडून त्‍याने सुरुवातीला शुल्‍क म्‍हणून साडेसात हजार रुपये वसूल करून घेतले. त्‍यानंतरही आपल्‍याला आणखी मुली कामासाठी आण असे सांगून धमकावण्‍यात आले. आपण आणखी मुली आणू शकत नसल्‍यामुळे त्‍याने आपल्‍याकडून पैसे मागण्‍यास सुरुवात केली. या दरम्‍यान, आपल्‍याला मडगाव येथील फ्‍लॅटवर आणून आपल्‍यावर लैंगिक अत्‍याचार केले व चाळीस लाख उकळले, असे त्या युवतीने तक्रारीत नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे सेपाक टाक्रो प्रेम!

दारूतून पाजले गुंगीचे औषध; गोव्यात सलून चालवणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Aguada: 'खराब हवामानात बोट खोल समुद्रात गेलीच कशी'? आग्वाद क्रूझ घटनेची गंभीर दखल; बंदर कप्तान खाते करणार कडक कारवाई

Kidnapping Cases: दक्षिण गोव्यात काय चाललंय? 117 अल्पवयीन मुलांचे अपहरण; प्रेम प्रकरणातून पळून जाण्याच्या घटना वाढल्या

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीमुळे 31 शेतकऱ्यांना फटका, 'आधारनिधी' अंतर्गत मिळणार नुकसानभरपाई; अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT