Mamata Banerjee to visit Goa today  Dainik Gomantak
गोवा

ममता बॅनर्जी आज गोव्यात

गोमंतकीयांशी ममता बॅनर्जी उद्या साधणार संवाद

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू झाल्याने राज्याबाहेरीलही अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. यात तृणमूल कॉंग्रेस (TMC) आघाडीवर असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) गुरुवारी संध्याकाळी गोव्यात येत आहेत. उद्या, 29 ऑक्टोबर रोजी त्यांचे राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

बॅनर्जी दोन दिवसांच्या गोवा भेटीत विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. तृणमूल कॉंग्रेस कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. नंतर त्या गोमंतकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांच्याशी चर्चा करतील. शिवाय ऐतिहासिक महत्त्व असलेली मंदिरे आणि चर्चलाही भेट देण्याची शक्यता आहे. आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप खूपच गंभीर आहेत. राज्यात सत्ताधारी भाजपविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी यतीश नायक, स्वाती केरकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT