Chief Minister West Bengal  Mamata Banerjee
Chief Minister West Bengal Mamata Banerjee Dainik Gomantak
गोवा

ममता बॅनर्जी गोव्यात दाखल !

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे आज गुरूवार 28 ऑक्टोबर रोजी गोव्यात संध्याकाळी साडेपाच वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले. तृणमूलचे लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी बॅनर्जी यांचे स्वागत केले.यावेळी त्यांच्या समवेत लवू मामलेदार, सांगेचे प्रसाद गावकर उपस्थित होते. यावेळी दाबोळी विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तीन दिवस त्या गोव्यात असतील. या तीन दिवसांत अन्य पक्षातील काही आमदार तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.यांमुळे 30 ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच राजकीय उलथापालथी पहायला मिळणार आहेत.

ममता यापूर्वी कधीच गोव्यात आलेल्या नाहीत. त्या प्रथमच गोव्यात दाखल होतील. तृणमलच्या एकूणच सगळ्या घडामोडींनंतर ममता बॅनर्जी यांची ही पहिलीच गोवा व्हिजिट आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या या पहिल्या वाहिल्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूलकडूनही जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान ममता बॅनर्जीच्या या दौऱ्या दरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता होती.त्यानुसार आज दाबोळी विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांनी आपण गोव्यात येत असल्याचं यापुर्वीच स्पष्ट केलं होतं. यावेळी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं.नव्या आघाडीतून नवी सकाळ उजाडण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT