Malpe Dainik Gomantak
गोवा

Malpe Landslide : मालपे दरडप्रकरण कंत्राटदार, अभियंत्याविरुद्ध गुन्हा नोंदवा

गोमन्तक डिजिटल टीम

Malpe Landslide :

पेडणे, राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मालपे येथे दरड कोसळून संरक्षक भिंत पडल्याप्रकरणी रस्ता बांधकाम कंत्राटदार एमव्हीआर कन्स्ट्रक्शन कंपनी तसेच रस्ता विभाग बांधकाम विभागाचे अभियंते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे आणि इतरांनी पेडणे पोलिस स्थानकात लेखी तक्रार देऊन केली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मालपे येथे शनिवारी दरड कोसळून या रस्त्याशेजारी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत पडली. याचवेळी तेथून चारचाकी वाहन जात होते. या दुर्घटनेत सुदैवाने या गाडीतील महाराष्ट्रातील कुटुंब वाचले. मात्र, हा रस्ता पूर्णपणे धोकादायक आणि जीवघेणा असून या रस्त्यावर बांधलेली संरक्षण भिंत निकृष्ट दर्जाची आहे.

या घटनेस जबाबदार असलेले बांधकाम ठेकेदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून कारवाई करावी, असे या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक, अनिल केरकर, सिद्धेश मोरे, संजय कांबळी आदी उपस्थित होते.

संजय बर्डे म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे या भागात दरड कोसळली होती. त्यावेळी आम्ही संबंधित कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. मात्र, अशा घटना वारंवार घडूनही सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

कंत्राटदार हे भाजपचे सरकारचे जावई आहेत. या महामार्गावर अनेकवेळा दुर्घटना घडून अनेकांचे बळी गेले. मात्र, संबंधित कंत्राटदार कंपनीला सरकार आणि मुख्यमंत्री पाठीशी घालत आहे. यापुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

कामात भ्रष्टाचाराचा आरोप

सामाजिक कार्यकर्ते दीपेश नाईक म्हणाले, की शनिवारी मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावर संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे या कामाचा दर्जा लक्षात येतो.

अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम झाले आहे. याला सर्वस्वी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते जबाबदार आहेत. मात्र, सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे हा मोठा भ्रष्टाचार असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बुधवारपर्यंत तोडगा न काढल्यास स्थानिक आमदारांच्या दारात ओतणार कचरा

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 'मटका खुलेआम', केवळ ३१८ प्रकरणांची नोंद; 'कडक कारवाई'च्या आदेशाला वाटाण्‍याच्‍या अक्षता

Goa Drugs Case: अक्षयकुमारला ओडिशात अटक; ड्रग्‍जडिलिंग प्रकरणी पाच दिवसांची कोठडी

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

SCROLL FOR NEXT