पणजी: राज्याच्या सागरी हद्दीत कर्नाटकातील मालपे येथील मच्छिमारी नौका घुसखोरी करत असल्याच्या स्थानिक मच्छिमारांच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असतानाच मालपे येथील मच्छिमारांनी आपली बाजू मांडण्यासाठी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे. कर्नाटक आणि गोव्यातील मासेमारी नियमांतील तफावतीमुळे ही घुसखोरी झाल्यासारखे वाटते असा दावा त्यांनी केला.
मालपे मच्छिमार संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने उडुपीचे आमदार यशपाल सुवर्ण यांच्या नेतृत्वाखाली हळर्णकर यांची भेट घेतली. कर्नाटक-गोवा राज्य सीमेजवळील मच्छिमारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
आमदार यशपाल सुवर्ण यांनी कर्नाटक आणि गोवा यांच्यातील सागरी मैल मर्यादेच्या अस्पष्टतेमुळे होणाऱ्या बोटी जप्तीच्या आणि दंडांच्या घटनांवर प्रकाश टाकला.मालपे मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष दयानंद सुवर्ण यांनी कर्नाटक आणि गोवा राज्यांमधील मासेमारी नियमांतील फरकांमुळे मच्छिमारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भर दिला.
या चिंतेला उत्तर देताना मंत्री हळर्णकर यांनी समस्या मान्य केली. पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची बैठक बोलावून केंद्र सरकारच्या माध्यमातून एकसंध मासेमारी धोरण प्रस्तावित केले जाईल, ज्यामुळे दीर्घकालीन तोडगा निघेल,असेही ते म्हणाले.
बैठकीला कर्नाटक मत्स्य व्यवसाय विभागाचे संचालक दिनेश कलेर, मालपे मेकॅनाइज्ड ट्रॉल बोट फिशरमन को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष रामचंद्र कुंदर, उपाध्यक्ष प्रकाश बांगेरे, मालपे डीप सी ट्रॉल बोट असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध मेंडोन आणि ३७० बोट मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर कुमार उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.