Goa Fish Market Dainik Gomantak
गोवा

Malim News: गोवेकरांनाच मिळतात 'मासे' महाग? निर्यात मासळीमुळे सावळागोंधळ; 'मत्स्य' खात्याने लक्ष देण्याची गरज

Malim Jetty: गोवा सरकारद्वारे नागरिकांना स्वस्त दरात मासळी मिळावी, यासाठी मासेमारीसाठी टॉलर्सधारकांना डिजेलवर अनुदान दिले जाते. गोव्याच्या मच्छीमारांना काही प्रमाणात सवलत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातात

गोमन्तक डिजिटल टीम

Malim Jetty Fish Rates

पणजी: गोवा सरकारद्वारे नागरिकांना स्वस्त दरात मासळी मिळावी, यासाठी मासेमारीसाठी टॉलर्सधारकांना डिजेलवर अनुदान दिले जाते. गोव्याच्या मच्छीमारांना काही प्रमाणात सवलत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त मासे काही मिळत नाहीत. तेथे मासे महाग असतात.

अनेक नागरिक मालीम जेटीवर बाजारापेक्षा स्वस्त आणि ताजी मासळी मिळेल, या आशेने खरेदीसाठी जातात. परंतु तेथे जाणे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी अवस्था होते.

मालीम जेटीवर येणारे मासे हे गोव्यातील समुद्रातील कमी असतात आणि आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून आलेली मासे अधिक असतात. गोवेकरांना स्थानिक मासळी शक्यतो मिळत नाही. ही मासळी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्यामुळे मालीम जेटीवर खरेदीसाठी गेलेल्या मत्स्यप्रेमी खवय्यांची मोठ्या प्रमाणात निराशा होते.

पणजी बाजारात जर इसवण ५०० रूपये किलो असेल मालीम जेटीवर इसवणाचा दर ५५० रुपये असतो. इतर मासळीचे दरही बाजारापेक्षा चढेच असतात. मालीम जेटीवर मासळी विकणारी नेमके स्थानिक विक्रेते की इतर कोणी याबाबतही साशंकता निर्माण होते. त्यामुळे या प्रकाराकडे मत्स्य व्यवहार संचालनालयाने योग्य ती दखल घेत कारवाई करण्याच्या मागणीत वाढ होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT