Mala Lake Dainik Gomantak
गोवा

प्राणवायूचे प्रमाण एकदम घटल्‍याने हजारो मासे मृत, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीचा निष्‍कर्ष

Mala Lake: मळा-पणजी येथील तळ्यातील प्राणवायूचे प्रमाण केवळ ०.८ मिलिग्रॅम प्रतिलीटर इतके आढळल्याने तळ्यातील पर्यावरणीय स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मळा-पणजी येथील तळ्यातील प्राणवायूचे प्रमाण केवळ ०.८ मिलिग्रॅम प्रतिलीटर इतके आढळल्याने तळ्यातील पर्यावरणीय स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. किमान ३ मिलिग्रॅम प्रतिलीटरपेक्षा जास्त असायला हवे असलेले हे प्रमाण धोकादायकरीत्या घटल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्राणवायूअभावीच तळ्यातील हजारो मासे मृत झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

शनिवारी मंडळाच्या पथकाने तळ्याच्या पाण्याचे नमुने संकलित केले होते. मंडळाच्या प्रयोगशाळेत सोमवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आलेल्या चाचणीत प्राणवायूची पातळी अत्यंत खालावलेली असल्याचे सिद्ध झाले.

दरम्‍यान, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यासंदर्भातील सविस्तर लेखी अहवाल बुधवारी पणजी महापालिकेला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार आहे.

माशांच्या मृत्यूमागील संभाव्य कारणे

मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे पुढील कारणांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १) प्रक्रिया न केलेले मलजल तळ्यात सोडणे. २) तळ्यात ताज्या पाण्याचा पुरवठा बंद होणे. ३) औद्योगिक सांडपाणी मिसळणे (ही शक्यता कमी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोळी झाडली ती बंदूक बेकायदेशीर, श्‍‍वेत गावडेला खुनाच्‍या आरोपाखाली अटक; 4 दिवसांची पोलिस कोठडी

Drowning Death: भावासाठी जीवाची बाजी लावूनही बहिणीचा अंत, कुडचडेत शोककळा; समुद्राने हिरावले दोन निष्पाप जीव

विरोधापुढे झुकणार नाही, भूरूपांतर वादावर सरकार ठाम; विशेष अधिवेशनाला अनुत्‍सुक

Daily Horoscope: मंगळवार ठरणार मंगलमयी! 'या' राशींच्या नशिबात धनलाभाचे योग; घरात नांदणार सुख, शांती आणि समृद्धी

'मी कोणालाही घाबरत नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला पोप लिओ यांचं प्रत्युत्तर; शांततेचा संदेश सुरुच ठेवणार असल्याचं केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT