Crime News Dainik Gomantak
गोवा

Majorda: धीरयोत उधळलेल्या रेड्याने शिंग भोसकले, एकाचा मृत्यू; तिघे संशयित फरार, पोलिस हतबल

Bull attack Goa: माजोर्डा धीरयो प्रकरणी कुडतरीचे माजी पंच सदस्य रुई मिनेझिस याचा ठावठिकाणा पोलिसांना अजूनही लागू शकला नाही. त्याने मोबाईलही बंद करून ठेवला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: माजोर्डा धीरयो प्रकरणी कुडतरीचे माजी पंच सदस्य रुई मिनेझिस याचा ठावठिकाणा पोलिसांना अजूनही लागू शकला नाही. त्याने मोबाईलही बंद करून ठेवला आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर आता पाळत ठेवली आहे.

तो घटनेच्या दिवसांपासून घरी फिरकलेला नाही. घरची मंडळीही पोलिसांना दाद देत नाहीत. त्यामुळे पोलिस हतबल झाले आहेत. या प्रकरणी राकेश यादव व मीनिन डिसोझा हे अन्य दोघे फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत. या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

दक्षिण गोवा सत्र न्यायालयात उद्या (ता. ३०) या अर्जांवर सुनावणी होणार आहे. गेल्या सोमवारी माजोर्डा येथील धीरयोत उधळलेल्या एका रेड्याने राजेश निस्तानी याला शिंग भोसकल्याने तो ठार झाला होता. कोलवा पोलिसांनी मागाहून या प्रकरणी सांतान कार्दोज, जॉकिम पेरेरा व जुझे कुलासो या तिघांना अटक केली होती.

माजोर्डा येथील एका निर्जन शेतात (Farm) बैलांची झुंज होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. यासाठीच बैलाला येथे आणण्यात आले होते. त्याचवेळी धक्कादायक घटना घडली. बैलांच्या झुंजीचा खेळ गोव्याच्या काही भागात पारंपारिक मानला जातो, पण तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बैलाच्या हल्ल्यात राजेश निस्तानी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: नवरात्रीसाठी फ्लाईटमुळे उशीर झाला गुजराती प्रवाशांनी 'गोवा' विमानतळावरच सुरु केला गरबा; पायलट, हवाई सुंदरीही थिरकल्या Watch

Pakistan Cricket Team: आशिया कपमधील 'अपमानास्पद' पराभव! पीसीबीने घेतला मनावर, 'फ्लॉप शो'मुळे खेळाडूंवर केली कारवाई

Quetta Blast: पाकिस्तानातील क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; 10 जणांचा मृत्यू, 32 हून अधिक जखमी Watch Video

मनोज परब अडचणीत, मंत्री हळर्णकरांशी हुज्जत भोवली; कोलवाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार; कधी अन् कुठे होणार सामना? एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT