Panaji Smart City Pramod Yadav
गोवा

Panaji Traffic Issue: पणजीतून प्रवास करताय? 'या' महत्वाच्या मार्गावर '35' दिवसांसाठी केलाय वाहतूक बदल

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हागे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Pramod Yadav

Panaji Smart City Traffic Issue: राजधानी पणजीत मागील अनेक दिवसांपासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहेत, त्यामुळे वाहतुकीसाठी अडढळा निर्माण होत आहे.

दरम्यान, जवळ येत असलेला पावसाळा आणि G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांना वेग आला आहे. सध्या सांतीनेज परिसरात विविध कामे सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हागे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार ताज विवान्ता जंक्शन पासून काकुलो मॉल या मार्गावर एकेरी वाहतूक असणार आहे.

या मार्गावर सध्या भूमीगत पाईपलाईन टाकण्यासह विविध केबलिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी मार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.

एकेरी वाहतुकीचा आदेश मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी होणार?

ताज विवान्ता जंक्शन ते काकुलो मॉल हा सांतीनेज परिसरातील एक प्रमुख आणि वाहनांची अधिक वर्दळ असणारा मार्ग आहे. दरम्यान, मार्गावर एकेरी वाहतूक केल्यानंतर मिरामार रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

तसेच, पुढे अटल सेतुमुळे देखील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT