MLA Disqualification Petition Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: कामत, लोबो यांना झटका; पाटकर यांची याचिका विधानसभा सभापतींनी केली मान्य

कामत आणि लोबो यांची मागणी सभापतींनी फेटाळली असून, हा दोघांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

Pramod Yadav

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता प्रकरणी गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेली याचिका विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी मान्य केली आहे. आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो (Michael Lobo and Digambar Kamat) यांनी ही याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, कामत आणि लोबो यांची मागणी सभापतींनी फेटाळली असून, हा दोघांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) सभागृहाचे सदस्य किंवा आमदार नसल्यामुळे ते अपात्रता याचिका दाखल करू शकत नाहीत. असा दावा करत आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी याचिका नामंजूर करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, पाटकर यांनी सभापती विरुद्ध उत्कल केशरी परिदा या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत, कोणतीही इच्छुक व्यक्ती अपात्रता याचिका दाखल करू शकते असा युक्तिवाद केला.

भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार कोणत्याही इच्छुक व्यक्तीला अपात्रता याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे त्यानुसार, दोन आमदारांनी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. असे सभापतींच्या निर्णयात म्हटले आहे.

याप्रकरणाचा आता गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्यात येईल, असे सभापती तवडकरांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT