Fire At Santrem village  Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa : सत्तरीत तीन ठिकाणी आग्नितांडव

वाळपई अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Rajat Sawant

Fire in Goa : गोव्यात दररोज आगी लागण्याच्या घटना वाढत असून लाखोंची नुकसानी होत असल्याचे समोर येत आहे. म्हादई अभयारण्यातील नगरगाव-सत्तरी पंचायत क्षेत्रातील साट्रे गावामधील क्रांतीवीर दीपाजी राणेंचा गड म्हणून प्रसिद्ध असलेले जंगल काल वणव्यामुळे आग लागून जळून खाक झाले.

दरम्यान आज अशाच तीन आगीच्या घटना सत्तरी तालुक्यात समोर आल्या आहेत. या आगीच्या घटना सध्या म्हादई अभयारण्यात लागलेल्या वणव्याचा परिणाम आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. चोर्ला घाट, चरावणे आणि केरी येथे 3 ठिकाणी भीषण आग लागली आहे.

चोर्ला घाटात घाटाच्या वरील टप्प्यामध्ये काल संध्याकाळी आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वन खात्याचे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यरत होते. केरीत काजूच्या बागेला आग लागल्याची दुसरी घटना घडली आहे. चरावणे या ठिकाणी सरकारी वनक्षेत्रामध्ये आग लागल्याची तिसरी घटना घडली आहे.

वाळपई अग्निशामक दलाकडे उपलब्ध असलेली तीन पाण्याची वाहने व जवान तीन ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

गत 24 तासांत आगीचे 81कॉल

राज्यात आगीच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत, असे चित्र आहे. कारण मागील चोवीस तासांचा विचार केला तर 85 कॉल अग्निशमन दलाकडे आले. त्यातील 81 कॉल आगीशी निगडीत, तर इतर 4 तत्काळ कॉल असल्याचे नोंदले आहेत.

त्याशिवाय मागील 56 तासांत म्हणजेच3 मार्च ते 5 मार्च दुपारी 3 पर्यंतच्या एकूण 56 तासांत एकूण १७७ कॉलची नोंद झाली आहे. 177 कॉलपैकी 163 कॉल हे आगीशी निगडीत होते. यामध्ये सर्वाधिक १७ टक्के कॉल हे मडगावमधून आले. या सर्व घटनांमध्ये ३४ लाखांची मालमत्ता हानी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गत निवडणुकीपासून प्रतिक्षित, प्रमुख सरकारी महामंडळांवर अचानक नियुक्त्या का?

Goa Today's News Live: म्हावळींगे खून प्रकरण; 'मास्टरमाईंड'ला डिचोली पोलिसांकडून अटक

डायपरमुळे लहान मुलांच्या किडनीला धोका? व्हायरल व्हिडिओतील दावा डॉक्टरांनी काढला खोडून, वाचा काय म्हणाले

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

SCROLL FOR NEXT