Chroma Store  Dainik Gomantak
गोवा

Porvorim : पर्वरीतील क्रोमा स्टोरला आग; 'अग्निशामन'च्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

पर्वरी येथील मुख्य मार्गावर घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी येथील मुख्य मार्गालगत असणाऱ्या काॅपेल जवळील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरूमला आग लागली असून या आगीत स्टोर सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेचे गांभिर्य ओळखत सर्व कर्मचारी आणि ग्राहकांना स्टोअरमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामनच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे.

(Major fire erupts in the building where Croma store is located at Porvorim)

मिळालेल्या माहितीनुसार पर्वरीतील मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या क्रोमा स्टोर सेंटरला आज सायंकाळी आग लागली, यात 80 हजाराचे साहित्य जळाले आहे. सेंटरमध्ये धुराचे लोळ उठू लागताच ग्राहकांना बाहेर काढण्यात आले. तसेच कर्मचारी ही बाहेर पडले. थोड्याच वेळात अग्निशामन दल घटनास्थळी दाखल होताच आग आटोक्यात आली आहे. अशी माहिती पर्वरी अग्निशामक दलाचे सब ऑफिसर पेडणेकर यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार जवळपास सायंकाळी सहा वाजता पोलीस स्थानकातून फायर स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाचे हवालदार नारायण माझी, लक्ष्मण परिवार, लक्ष्मण शेट्ये, सोहन चोपडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कोणासही इजा किंवा प्राणहानी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT