Cortalim Car Accident Dainik Gomantak
गोवा

Cortalim Car Accident : कुठाळ्ळीत भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक; तिघेजण जखमी

अपघातातील जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

कुठाळ्ळी येथे भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाला तर दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. अपघाताग्रस्त कारच्या चालकाला अग्निशमक दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका भरधाव कारने एका दुचाकीवरील जोडप्याला व पाव विक्रेत्याला धडक दिली. त्यानंतर भरधाव कारची धडक वीजेच्या खांबाला बसली. ही धडक इतकी भीषण होती की कार वीजेच्या खांबाला धडकून उलट दिशेने घराच्या कंपाऊंडमधील आंब्याच्या झाडाला धडकली.

या अपघातात कारच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले. तर कारचालक गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील जोडपे जखमी झाले असून यातील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. तर पाव विक्रेताही जखमी झाला. जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT