Mahua Jharkhand Dainik Gomantak
गोवा

झारखंडच्या प्रसिद्ध 'महुआ'ला गोव्यातील ब्रँडेड वाईन उत्पादक कंपनीचा सहारा; सुरू करणार कारखाना

गोव्यात वाईनचे उत्पादन करणाऱ्या एका ब्रँडेड कंपनीने झारखंडमधील महुआपासून बनवलेले मद्य निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

Pramod Yadav

Mahua Jharkhand: झारखंडच्या महुआ मद्याची मागणी वाढली असून, देशातील प्रसिद्ध वाईन बनवणाऱ्या कंपन्याही या व्यवसायात सहभागी होऊ इच्छा व्यक्त करत आहेत. मुबलक उत्पादन होत असले तरी झारखंडमध्ये महुआचा व्यावसायिक वापर होत नाही.

दरम्यान, आता गोव्यात वाईनचे उत्पादन करणाऱ्या एका ब्रँडेड कंपनीने झारखंडमधील महुआपासून बनवलेले मद्य निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास स्वारस्य दाखवले आहे. यामुळे राज्यात रोजगार निर्माण होण्यासह आर्थिकदृष्ट्याही मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झारखंडमध्ये महुआ मद्याचा वर्षानुवर्षे अवैध धंदा सुरू आहे. याचा गैरफायदा दारू माफिया आणि समाज विघातक संघटना घेत आहेत. झारखंडच्या जंगलात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि फुलांचा मुबलक साठा असतानाही महुआ फ्लॉवर व्हॅल्यू अ‍ॅडिशन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कंट्रोल अ‍ॅक्टची पाच वर्षांत अंमलबजावणी होऊ शकली नाही.

सन 2017 मध्ये, उत्पादन विभागाचे तत्कालीन आयुक्त भोर सिंग यादव आणि महुआवर अनेक वर्षे काम करणाऱ्या होडोपाथी एथनोमेडिसिन डॉक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (हेदान) यांनी एकत्रितपणे त्याचा मसुदा तयार केला होता.

झारखंडमध्ये वाईन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या गोव्यातील वाईन कंपनीचे मालक डेस्मोन नाझरेथ यांना फळांच्या रसांपासून वाईन आणि बिअर बनवण्याचे कौशल्य आहे. त्यांनी संशोधन म्हणून महुआच्या फुलापासून उत्कृष्ट दर्जाची अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेये बनवली आहेत.

तसेच, जमशेदपूरचे गुंतवणूकदार कन्हैया प्रसाद यांनीही महुआच्या फुलांपासून बनवलेल्या शीतपेयासाठी कारखाना सुरू करण्यासाठी पैसे गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने आणि परवाना न मिळाल्याने महुआचे उत्पादन आणि उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही.

महुआचा सूक्ष्म अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे महुआ रोटी, केक, जेली, लोणचे बनवून महिलांना थेट स्वयंरोजगाराचा लाभ मिळू शकणार आहे. असे यासंबधित तज्ञ सांगतात.

दरम्यान, महुआचा केवळ वाईन बनवण्यासाठीच वापर होत नाही तर, लाडू, बिस्किटे, लोणचे, आयुर्वेदिक औषधे आणि बरेच विविध पदार्थ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. राज्यातील लोहरदगा जिल्ह्यात सुरुवातीला लाडू आणि बिस्किटे बनवण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT