उपपीठ गोवा येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन  Dainik Gomantak
गोवा

उपपीठ गोवा येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम (महाराष्ट्र) उपपीठ गोवा येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम (महाराष्ट्र) उपपीठ गोवा येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून देश, विदेश, कोरोना या महामारीमुळे त्रस्त होऊन, सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. या महामारीमुळे श्री सांप्रदायिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आले होते. परंतु आता या महामारीचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने सरकारने लाॅकडाऊन काढल्याने श्री सांप्रदायिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत. आणि हे कार्यक्रम गोवा पीठावर साजरा करण्यात येणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाच्या कार्यक्रमाने सुरुवात करण्यासाठी गोवा उपपीठ सज्ज झाले आहे.

गोवा, सिंधुदुर्ग, उत्तर कन्नड, उत्तर बेळगाव, बेळगाव शहर सज्ज झल्याने महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून खंडित राहीलेला हा उपक्रम राबविण्यासाठी सर्व हितचिंतक, भक्त, साधक व शिष्य यांची गोवा उपपीठावर लगबग सुरू झाली आहे.

महाशिवरात्री उत्सव सोहळा मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने शिवमंदिर गोवा उपपीठावर सकाळी काकड आरती, मंदिरात नित्य पूजा व महापूजा,धुपारती, लघुरुद्र याग व अभिषेक, श्री दर्शन, महाराज,पालखी परीक्रमा,सांजारती, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष श्री भोलेनाथांच्या शिव पिंडीवर अभिषेक करण्यात येणार आहेत. तसेच लघूरुद्र याग, करण्यात येणार आहेत. शेवटी शेजारती व कार्यक्रमाने सांगाता करण्यात येणार आहे. तरी सर्व हितचिंतक भक्त साधक आणि शिष्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करुन श्रींच्या कृपार्शिवादाचा लाभ घ्यावा असे गोवा उपपीठाचे व्यवस्थापक लोचन राऊत यांनी समस्त हितचिंतक, भक्त साधक व शिष्यांना निमंत्रीत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT