Goa News
Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: ‘हर, हर महादेव’चा जयघोष ! हरवळेत महाशिवरात्रीचा उत्साह

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘हर, हर महादेव’चा जयघोष आणि ‘ॐ नमः शिवाय’ मंत्रोच्चाराने गोमंतकातील तीर्थक्षेत्र असलेल्या हरवळेत शनिवारी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यंदा महाशिवरात्री उत्सवाला हरवळेत भक्तांचा महापूर लोटला होता. पहाटेपासूनच श्री रुद्रेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भाविकभक्तांच्या रांगा लागल्या होत्या. ‘कोविड’ निर्बंधांनंतर यंदा मुक्त वातावरणात महाशिवरात्री साजरी झाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला होता. वेगवेगळ्या भागांतून भाविक हरवळेत आले होते.

शनिवारी पहाटेपासून मुक्तद्वार महापर्वणीला सुरुवात झाली. देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांच्यातर्फे प्रथम अभिषेक करण्यात आला. नंतर भाविकांतर्फे श्रींच्या लिंगावर स्वहस्ते रुद्राभिषेकास सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त भविकांना फराळ तसेच दुपारी महानैवेद्याची व्यवस्था करण्यात आली होती.

हजारो भाविकांनी फराळ व महानैवेद्याचा आस्वाद घेतला. गोव्यासह शेजारच्या राज्यातील भक्तांनी मुक्तद्वार महापर्वणीद्वारे श्री रुद्रेश्वर देवाच्या चरणाकडे सेवा अर्पण केली.

भाविकांनी हरवळे नदीत शुचिर्भुत होऊन त्याठिकाणीही अभिषेक केला. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पहाटेपासून दिवसभर हरवळेत मंगलमय वातावरण पसरले होते.

महाशिवरात्रीनिमित्त विविध खेळणी, कपडे आदी साहित्याच्या स्टॉल्सची फेरी भरली होती. देवस्थानचे पदाधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. पोलिस फौजफाट्यासह आपत्कालीन सेवाही तैनात करण्यात आली होती. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्यासह पोलिस आदी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT