Shivjayanti : डिचोलीत आज शिवजयंती सोहळा; ढोलताशांच्या निनादात भव्य मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोली नगरीत रविवारी छत्रपती शिवरायांचा जयजयकार घुमणार आहे.
Shivjayanti
ShivjayantiDainik Gomantak

Shivjayanti: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोली नगरीत रविवारी छत्रपती शिवरायांचा जयजयकार घुमणार आहे. शिक्षा व्हिजन, डिचोली आणि शिवप्रेमींतर्फे यंदा शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्त ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डिचोलीत शिवाजी महाराज सर्कलवरील अश्वारूढ पुतळ्यासह जुन्या बसस्थानकावर आणि शारदानगर-बोर्डे येथे मिळून छत्रपती शिवरायांचे तीन पुतळे उभारण्यात आले आहेत.

तिन्ही ठिकाणी विविध संघटनांतर्फे पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे.

शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष तथा डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते शारदानगर, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल आणि जुन्या बसस्थानकावरील मिळून शहरातील शिवरायांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे.

Shivjayanti
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले ऋणानुबंध

दत्तात्रय मंदिराकडून मिरवणुकीस प्रारंभ !

शिवजयंतीनिमित्त शिक्षा व्हिजन, डिचोलीतर्फे ढोल-ताशांच्या निनादात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पाजवाडा येथील श्री दत्तात्रय मंदिराकडून सकाळी 9 वा.

मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आतीलपेठ, गावकरवाडा, बंदरवाडा, बगलमार्ग, चव्हाटा-बोर्डे, वडाचावाडा, शारदानगर, भायलीपेठमार्गे जुन्या बसस्थानकावर येताच मिरवणुकीची सांगता होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com