CM Dr. Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa's Mahashivratri 2025: रुद्रेश्वर मंदिरात होणार आध्यात्मिक पर्यटनाचा विकास; मुख्यमंत्र्यांकडून शिवमंदिरात सेवा अर्पण

Mahashivratri 2025 Goa: हरवळे,साखळी येथील श्री रूद्रेश्वर देवस्थानात प्रसिध्द असलेल्या महाशिवरात्री उत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू आहे

Akshata Chhatre

हरवळे: राज्यात सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्साह आहे. २६ फेब्रुवारी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तांबडी सुर्ला येथील प्राचीन शिवमंदिरात प्रार्थना केली. गोव्यात विविध भागांमध्ये शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो, यांपैकी हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक या मंदिराला भेट देतात. हरवळे,साखळी येथील श्री रूद्रेश्वर देवस्थानात प्रसिध्द असलेल्या महाशिवरात्री उत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू आहे. दरवर्षी इथे दर्शनासाठी भाविकांची बरीच गर्दी पाहायला मिळते आणि यंदा लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान समिती, उपजिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.

रुद्रेश्वर मंदिर भक्तांनी सजले

हरवळे, साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी गोमंतक टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपासून देवस्थानात उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. भजन आणि कीर्तनानंतर पालखी उत्सव देखील साजरा करण्यात आलाय. महाशिवरात्रीच्या निमित्ताने बुधवारी पहाटे ३ वाजता मंदिरात पहिला अभिषेक करण्यात आला आणि आता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

मंदिराच्या आयोजन समितीकडून सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांच्या खाण्यापिण्याची सोय देखील तयार करण्यात आलीये. शिवरात्रीच्या निमित्तानेरात्री नाटकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देखील अध्यक्ष यशवंत माडकर यांनी दिली.

हरवळे मंदिराचा आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार - मुख्यमंत्री

हरवळे मंदिर परिसराचा "आध्यात्मिक पर्यटन"च्या दृष्टीने सुमारे १७ कोटी खर्चून विकास होणार असून यासाठी निविदा जारी करण्यात आला आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी स्वच्छता राखावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. हरवळे येथे श्री रूद्रेश्वर देवस्थानात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह उपस्थित राहून अभिषेक केला.

गोव्यात शिवरात्रीचा उत्सव:

राज्यात दरवर्षीच शिवरात्रीचा उत्साह दिसून येतो. शिवशंकरांच्या उपासनेसाठी शिवभक्त ठिकठिकाणी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गोव्यात विविध ठिकाणी पूजा, अभिषेक, रुद्र पठण आदी कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन बऱ्याच ठिकाणी करण्यात आले आहे. शिवभक्तांसाठी शिवरात्रीचा दिवस महत्वाचा मनाला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT