MGP Goa 
गोवा

MGP Goa: गावस यांच्या प्रवेशाचा विषय मिटला; ‘मगो’ची नाराजी दूर, मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

MGP Goa: लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र असल्याने भाजपला ‘मगो’ची मते मिळणे ठरलेले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

MGP Goa

वेळ दुपारची, स्थळ बांदोडा येथील ढवळीकर यांचे घर, प्रचार दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तेथे येतात. जेवण सुरू करणार तेवढ्यात अप्रिय विषय समोर येऊन आदळतो, पण मुख्यमंत्री हसत हसत विषय टोलवतात.

पुन्हा असे होणार नाही, याबाबत ‘मगो’च्या नेत्यांना आश्वस्त करतात. काल सावर्डे मतदारसंघातील ‘मगो’चे नेते बालाजी ऊर्फ विनायक गावस यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा संवाद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीनंतर ‘मगो’ने भाजपची साथ देताना ‘मगो’चे नेते फोडले जाणार नाहीत, अशी हमी घेतली होती. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र असल्याने भाजपला ‘मगो’ची मते मिळणे ठरलेले आहे.

असे असताना भाजपने ‘मगो’च्या सावर्डे मतदारसंघातील बड्या नेत्याला आपल्याकडे वळवल्याने ‘मगो’ पक्ष नाराज झाला आहे. लोकसभेचा प्रचार दोन्ही पक्ष एकत्र करत असताना भाजपने ‘मगो’चा नेता पळवण्यातून चांगला संदेश जात नसल्याचे मगोच्या नेत्यांचे म्हणणे होते.

‘त्यांना’ बोलावले नव्हते, स्वेच्छेने प्रवेश’

याबाबत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना विचारले असता ‘होय, मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारणा केली’, असे त्यांनी सांगितले. भाजपने अन्य पक्षाचे नेते पक्षात घेतले तर राजकीयदृष्ट्या त्यांना सोयीचे ठरणार आहे.

मगो व भाजप एकत्र असल्याने अशा नेते आयातीचा काहीच फायदा होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनीही भाजपने गावस यांना बोलावले नव्हते, तर त्यांनीच भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, असा खुलासा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT