Eknath Shinde-Devendra Fadnavis in Goa  Dainik Gomantak
गोवा

Eknath Shinde-Devendra Fadnavis in Goa : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस गोव्यात! 'हे' आहे कारण

Eknath Shinde-Devendra Fadnavis in Goa : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल होणार आहेत.

Kavya Powar

Eknath Shinde-Devendra Fadnavis in Goa : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल होणार आहेत. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या मुलाचा गोव्यातील हॉटेल 'सिदा दे गोवा'मध्ये रिसेप्शन कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांची उपस्थिती असून याला शिंदे-फडणवीस देखील हजेरी लावणार आहेत. (Eknath Shinde-Devendra Fadnavis in Goa)

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उद्या सोमवारी दुपारपर्यंत गोव्यात असणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये अनेक राजकीय खलबते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या सोमवारी ते गोव्यातील नेत्यांची भेट घेण्याची दाट शक्यता देखील आहे. या भेटीमुळे आणि दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्यांपूर्वी, शिवसेनेशी बंड पुकारल्यानंतर आणि भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत गोव्यातील हॉटेल ताज कन्वेन्शनमध्ये थांबले होते. अनेक राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT