Maharashtra CM Eknath Shinde with Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती; मुख्यमंत्र्यांकडून शिंदे यांचे अभिनंदन

दैनिक गोमन्तक

पणजी : बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या सहकारी बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आज पहाटे गोव्यात येऊन या आमदारांची विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. येत्या रविवारी (ता. 3) महाराष्ट्राचे विशेष अधिवेशन होत असून 4 जुलै रोजी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यासाठी हे सर्व आमदार मुंबईला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले. मुंबई - गोवा महामार्गासह रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील, अशी माहिती शिंदे यांनी गोव्यातून मुंबईकडे जाताना दिली. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण घेऊन आम्ही काम करत आहोत. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आम्ही करत राहणार आहोत. आम्ही शिवसेना म्हणूनच विधीमंडळामध्ये काम करणार आहोत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या महाराष्ट्रात शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच मदतीचा हात देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असून पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या विविध योजना मार्गी लावण्यात येतील.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या घडामोडीनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे गोव्यात दाखल झाले होते. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपले महाराष्ट्राबद्दलचे भविष्यातील धोरण स्पष्ट केले.

ते म्हणाले की, माझ्यासोबत असलेले 50 आमदार यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थकी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यांच्या मतदारसंघांमधील प्रलंबित प्रश्न आणि मतदारांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्याकडे माझे आणि सरकारचे लक्ष असेल. गेल्या अडीच वर्षांच्या कारभारामध्ये ज्या गोष्टी घडल्या तर पुन्हा घडू नयेत यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकताच
पत्रकारांनी बहुमत चाचणीबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की, बहुमत चाचणी ही आता फक्त एक औपचारिकता राहिली आहे. आमच्यासोबत असलेले 50 आमदार आणि भाजपचे 115 ते 120 मिळून एकूण 175 आमदार आमच्याजवळ असल्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बहुमत चाचणी ही एक औपचारिकता राहिली आहे.

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिसले. यावेळी पत्रकार परिषद घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. सत्तेसाठी रातोरात खेळ खेळले गेले आणि ते मुख्यमंत्री झालेत. माझ्या मनातून महाराष्ट्र कोणीही काढू शकत नाही, माझ्यासाठी जनतेच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंशी मी कधीच प्रतारणा करणार नाही. पर्यावरण बिघडवणारे कोणतेही काम करू नका. महाराष्ट्र उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन त्यांनी नवीन सरकारला केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT