Mahadayi Water Issue Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Issue: ‘सेव्ह म्हादई’चा ठराव केंद्रापर्यंत पोहोचवणार; राज्यपालांची ग्वाही

कर्नाटकचा सुधारीत ‘डीपीआर मागे घ्‍या’ मागणीची प्रत सादर

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला दिलेली मंजुरी तातडीने मागे घ्यावी, हा सेव्ह म्हादई चळवळीचा ठराव आज राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केला.

राज्यपालांनी चळवळीची भूमिका संबंधित खात्यांकडे पाठवली जाईल, असे म्हटले आहे, अशी माहिती सेव्ह म्हादई चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

केंद्रीय जल आयोगाने म्हादई संबंधीच्या कर्नाटकाच्या डीपीआरला दिलेल्या परवानगी नंतर राज्यात जनक्षोभ उसळलेला आहे. हा डीपीआर मागे घ्यावा यासाठी 16 जानेवारी रोजी सेव्ह म्हादई चळवळीची विर्डी - साखळी येथे जाहीर सभा झाली.

या सभेत घेण्यात आलेला ‘सुधारित डीपीआर मंजुरी तातडीने मागे घ्यावी’ हा ठरावाची प्रत आज राज्यपाल पिल्लई यांना सादर करण्यात आली. यावेळी चळवळीचे समन्वयक ह्रदयनाथ शिरोडकर, प्रा.प्रजल साखरदांडे , महेश म्हाबंरे, दुर्गादास कामत, प्रशांत नाईक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, चळवळीची भूमिका आणि घेतलेला ठराव संबंधित खात्यांकडे पाठवण्यात येईल. आपण राज्याचे आणि गोमंतकीय जनतेचे हित जपण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

SCROLL FOR NEXT