Protest |Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: कोळसा हाताळणी बंद करा; म्हादईला वाचवा!

म्हादईतील पाणी वळवण्याच्या विरोधात तसेच एमपीएत कोळसा हाताळणी विरोधात मुरगावात नागरिकांनी सरकारविरोधात निदर्शने केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: म्हादईतील पाणी वळवण्याच्या विरोधात तसेच एमपीएत कोळसा हाताळणी विरोधात मुरगाव बंदर प्राधिकरणाबाहेर तसेच वास्कोत रॅली काढून आज सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी निदर्शने केली. ‘आमची म्हादई वाचवा’ तसेच ‘कोळसा हाताळणी बंद करा’, अशी मागणी करत राज्य सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजी आमदार एलिना साल्ढाना, माजी नगराध्यक्षा तारा केरकर, प्रतिमा कुतिन्हो, नझीर खान, शंकर पोळजी, ओलेंन्सीयो सिमोईस, कीस्तोदीयो डिसोझा, अभिजीत प्रभूदेसाई यांच्यासह राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

दक्षिण गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वास्कोत म्हादई नदी पाणी वळवण्याच्या विरोधात तसेच मुरगाव पोर्ट ट्रस्टचा कोळसा विस्तार संदर्भात लढा देण्यासाठी वास्कोत रॅली काढली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘आमका नाका आमका नाका, कोळसो आमका नाका’, अशा घोषणा दिल्या.

सध्या कोळसा वाहतुकीची मर्यादा झिंदाल कंपनीला 6 अब्ज टनांवरून 13 ते 15 अब्ज टन एवढी वाढवून दिल्ली आहे. हा निर्णय जनविरोधी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच बागलकोट-गदग-विभागात प्रस्तावित असलेल्या म्हादईचे पाणी पोलाद प्रकल्पासाठी वळवण्याच्या कर्नाटकच्या उघड आणि गुप्त योजना आहे.

हे दोन मुद्दे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे लोकांना समजावून सांगण्यासाठी ही जनजागृती कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते आणि गोएंचो लोकांच्या बॅनरखाली सार्वजनिक उत्साही नागरिकांनी सुरू केला आहे.

आंदोलकांची घोषणाबाजी

आज सकाळी 11.30 वाजता रॅली वास्को रेल्वे स्थानकासमोरून सुरू करण्यात आली. सरकार विरोधात घोषणा देत रॅली टीबी कुन्हा चौक व पुन्हा रेल्वे स्थानकासमोर आली. यानंतर आंदोलकांनी हेडलॅण्ड सडा येथे एमपीएच्या प्राधिकरणाबाहेर जाऊन निदर्शने, घोषणाबाजी केली.

तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी एमपीए प्राधिकरणात अध्यक्षांना कोळसाविरोधात निवेदन दिले. यावेळी एमपीए प्राधिकरणा बाहेर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT