Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईचा सर्वोच्च न्यायालयातील लढा आम्हीच जिंकू, जलमंत्री शिरोडकरांना विश्‍वास

म्हादईविषयी आम्ही केंद्र सरकारकडे आणि सर्वोच्च न्यायालयातही परखडपणे बाजू मांडत आहोत, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादईविषयी आम्ही केंद्र सरकारकडे आणि सर्वोच्च न्यायालयातही परखडपणे बाजू मांडत आहोत. त्याशिवाय कर्नाटक सरकारला विविध स्तरावर विरोध करण्यासाठी 4 महिन्यांत 15 ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे.

प्रशासकीय पातळीवर राज्य सरकार हवे ते निर्णय घेत आले आहे. म्हादईचा सर्वोच्च न्यायालयातील लढा आम्ही जिंकू, असा विश्‍वास जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला.

म्हादईच्या विषयावरील चर्चेत त्यांनी सरकारची बाजू मांडली. याप्रसंगी तत्पूर्वी विरोधी गटातील ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, म्हादईच्या विषयावर आमदार होण्यापूर्वी आपण एक समिती नेमण्याची मागणी केली होती.

म्हादईच्या विषयावर राजकारण बाजूला ठेवून एकत्रित येण्याची आवश्‍यकता आहे. ज्यावेळी अशी गंभीर स्थिती निर्माण होते, तेव्हा इंटरलॉक्ट ॲप्लिकेशन सादर करणे आवश्‍यक असते, हेही त्यांनी सहभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

स्वामी तिन्ही जगाचा...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी,‘ या काव्यपंक्तीने सुरुवात केली. लोक आपणास पाहतात, तुम्ही काय केले ते. जेव्हा एक बिगरसरकारी संस्था साखळीत बैठक आयोजित करतात, त्यांना आम्ही पाठिंबा दिला.

आम्ही तेथे काही मत व्यक्त करणार नाही, ही पक्षाने भूमिका घेतली होती. मागील सरकारने कर्नाटकाला पर्यावरणीय संमती दिली होती, हेही त्यांनी सभागृहाला लक्षात आणून दिले.

यांनी मांडली मते

यावेळी आमदार कृष्णा साळकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, जेनिफर मोन्सेरात यांच्‍यासह रवी नाईक, सुदिन ढवळीकर, नीलेश काब्राल, रोहन खंवटे, मायकल लोबो, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, उल्हास तुयेकर, व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, एल्टन डिकॉस्ता, बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, माविन गुदिन्हो यांनी आपली मते मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT