Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: आमच्या कर्नाटकात येऊन आम्हालाच...; आप नेते & कर्नाटकचे अधिकारी यांच्यात बाचाबाची

आम आदमी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी कळसा नदीपात्राची पाहणी करण्यासाठी चालले होते

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटक सीमा भागातील कणकुंबी, पारवाड परिसरातून गोव्याकडे म्हादई नदीत येणारे पाणी उलट्या दिशेने वळविण्यासाठी कळसा-भांडुरा या उपनद्यांवरील प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली आहे. यावरून गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील म्हादईप्रश्नी दोन दिवसांपासून बैठकींचा धडाका लावला आहे. तर, विरोधकांनी म्हादईवरून सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी कळसा नदीपात्राची पाहणी करण्यासाठी चालले होते त्यावेळी त्यांची कणकुंबी येथे कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी अडवणूक केली.

कळसा या नदीपात्राची पाहणी करण्यासाठी गोव्यातील आपचे आमदार व्हेझी व्हिएगश आणि इतर पदाधिकारी जात होते. यावेळी त्यांना कणकुंबी येथे काही कर्नाटकच्या पदाधिकाऱ्यांनी अडकणूक केली. व त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. यावेळी आपच्या नेत्यांनी त्यांना कर्नाटकच्या कथित अधिकाऱ्यांना ओळखपत्राची मागणी केली. त्याव त्या अधिकाऱ्यांने आमच्या कर्नाटकात येऊन आम्हालाच ओळखपत्र विचारता अशी उर्मट प्रतिक्रिया दिली. बराच काळ वाद झाला. दरम्यान, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांना आपच्या पादाधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून गोंधळात टाकले. या सर्व वादाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

दरम्यान, म्हादई पाणी तंटा लवादाने जे पाणी वाटप केले आहे, तेच पाणी आम्ही वळवतो आहे. म्हादईवरील प्रकल्पांना जल आयोगाने मंजुरी दिल्यामुळे गोवा कर्नाटकला प्रकल्प पूर्ण करण्यापासून रोखू शरत नाही. पुढील महिन्यापासून आम्ही कामाला सुरूवात करणार आहोत. आणि येत्या एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. प्रकल्प झाला नाही तर मी स्वत:ला गोविंद करजोळ म्हणणार नाही, मी माझे नाव बदलेन. अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे जलस्त्रोत मंत्री गोविंद करजोळ यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT