Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ‘सेव्ह म्हादई’च्या झेंड्याखाली बैठकांना प्रतिसाद

या चळवळीतर्फे येत्या 16 तारखेला साखळीत म्हणजेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात सभा आयोजिली आहे.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: सेव्ह म्हादई या झेंड्याखाली तयार होत असलेल्या जनजागृतीविषयी व लोकचळवळीत जोडण्याकरिता सध्या विविध पक्षांसह इतर पर्यावरण संरक्षक, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठका सुरू झाल्या आहेत.

साखळी येथे 16 रोजी होणाऱ्या सभेत लोकचळवळीची ताकद दाखविण्यासाठी लोक एकत्रित येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच या चळवळीचे महत्त्व पटवून दिले जात असल्याची माहिती संघटनातील सदस्यांनी सांगितली.

सेव्ह म्हादईशी जोडल्या गेलेल्यांपैकी ॲड. हृदयनाथ शिरोडकर म्हणाले, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे सदस्य, पर्यावरणप्रेमी हे आपापल्या परीने लोक जागृती करीत आहेत. त्याशिवाय तालुकानिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकाही पार पडल्या आहेत.

म्हादई वाचविण्यासाठी लोकांचे एकत्रित येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच ठिकठिकाणी जागृती मोहीम राबविली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुधारित डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्टला (डीपीआर) केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्याने कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटक सरकार रेटून नेऊ शकते.

त्यामुळे हा डीपीआर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सेव्ह म्हादई ही सर्वपक्षीय आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे.

त्या चळवळीतर्फे येत्या 16 तारखेला साखळीत म्हणजेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात ही सभा आयोजिली आहे. त्यामुळे या सभेला मोठी गर्दी जमविण्याची जबाबदारी आयोजकांवर येऊन पडलेली आहे. त्यामुळेच लोकजागृती करीत लोकांना एकत्रित आणण्याचा सेव्ह म्हादई प्रयत्नशील आहे.

लोकजागृती करण्यासाठी तालुकानिहाय तसेच ग्रामीण भागातही बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे. राजकीय पक्षांचा झेंडा विसरून सर्व लोकांना एकत्रित करण्याचा या चळवळीची प्रयत्न असून, त्यास निश्‍चित यश येईल, असे शिरोडकर यांनी नमूद केले.

फोंडा, पणजीही बैठक

सेव्ह म्हादईच्या चळवळीसाठी विविध पक्षांसह सामाजिक कार्यकर्तेही बैठका घेऊन जागृती करीत आहेत. त्याशिवाय इतर सामाजिक संघटनांचाही या बैठकांना पाठिंबा मिळत आहे.

बुधवारी फोंडा आणि पणजीत काही महत्त्वाचे पदाधिकारी बैठक घेणार आहेत, अशी माहिती चळवळीतील सदस्यांनी दिली. आत्तापर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांच्या तीन प्रमुख बैठका झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT