Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : 43 दिवसांनंतरही गोव्याला ‘डीपीआर’ची प्रत नाहीच!

डीपीआरची प्रत राज्य सरकारला 43 दिवस ओलांडले तरी अजूनही प्राप्त झालेली नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करूनही त्याबाबत केंद्र अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येते.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute : केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. त्या डीपीआरची प्रत राज्य सरकारला 43 दिवस ओलांडले तरी अजूनही प्राप्त झालेली नाही.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करूनही त्याबाबत केंद्र अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येते.

डीपीआरची प्रत मिळविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

ज्या डीपीआरच्या मंजुरीनंतर कर्नाटक सरकार पाणी वळवण्यासाठी इतर कोणतेही कायदे लागत नाही, असे हिमतीने सांगते, त्या डीपीआरची प्रत राज्य सरकारला मिळविणे अवघड का झाले, हे समजत नाही.

एका बाजूला राज्य सरकारने सभागृह समिती स्थापन केली आहे. आता त्यासाठी तज्ज्ञ समितीही स्थापन केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, विधानसभेच्या कामकाजावेळीही डीपीआरची प्रत येणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही.

विधानसभेनंतर नेमलेल्या सभागृह समितीच्या पहिल्याच बैठकीत डीपीआरची प्रत मिळवली गेली पाहिजे होती, तेही घडले नाही. शिवाय डीपीआरची प्रत का मिळवली नाही, म्हणूनही कोणी त्यावर भाष्य केले नाही. डीपीआरमध्ये कोणते मुद्दे आहेत? ते गोव्यासाठी किती त्रासदायक आहेत? या सर्वांची उकल होणे आवश्‍यक होते.

तज्ज्ञ समितीला कालमर्यादा नाही..!

सभागृह समितीने तज्ज्ञ समिती नेमण्याचा जो निर्णय घेतला आहे, ती समिती काही दिवसांत नेमली जाईल. परंतु त्या समितीचा नेमका कार्यकाल किती असेल, हे सांगता येत नाही. कदाचित तीन महिने किंवा सहा महिनेही कालमर्यादा असू शकते, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

अनेकांकडून त्या समितीविषयी सूचना येऊ लागल्या आहेत. पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, वन खात्याचे माजी अधिकारी यांचा त्यात समावेश व्हावा, अशा सूचना सभागृह समितीकडे आल्या आहेत.

डीपीआर मंजुरीला 43 दिवस झाले असताना गोवा सरकारकडे त्याची साधी प्रत नाही, हे सभागृह समितीच्या बैठकीत उघड झाले. यावरून राज्य व केंद्रातील भाजप सरकारचे गोव्याची अस्मिता नष्ट करून गोवा संपविण्याचे कारस्थान स्पष्ट झाले आहे.

म्हादईबद्दल भाजप सरकारने नेहमीच गोव्याचा विश्वासघात केला. डीपीआरची प्रत मिळवू न शकलेल्या मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

SCROLL FOR NEXT